पान:हिंदी-सुमेरी संस्कुती.pdf/११२

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(१०८) या एकंदर विवेचनावरून त्रिस्तपूर्व सुमारे साडेपांच हजार वर्षांपूर्वी म्हणजे हल्लीच्या पूर्वी साडेसात हजार वर्षांमागें मेसापोटोमियांत आर्यवर्णीय सुमेरीलोक वसत असून जगताला दिपविण्यासारखी त्यांची संस्कृति होती व ते समेरीलोक व वैदिक आर्यलोक सर्वांशी अभिन्न होते, इतके पाश्चात्य शास्त्रज्ञांच्या व संशोधकांच्याच तोंडानें कबूल झाले आहे. अर्थात् वेदांचा आद्य काल ठरविण्याची यापूर्वीच्या मॅक्स- म्युलरादि अर्वाचीनांची सर्व प्रमाणे येथे लटपटली आहेत, व त्यामुळे तो काळ सुमेरी संस्कृतीच्याहि पूर्वीपर्यंत मागे ढकलणें अवश्य प्राप्त झाले आहे. इतक्या प्राचीन काळी हे दोनहि समाज अगदी एकत्र व एकजीव असल्याशिवाय त्यांच्यांतील अनेक- विध सांस्कृतिक साम्यांची उपपत्ति लागणे शक्य नाही. तथापि इतक्या केवळ अनु- मानावरहि अवलंबून न राहता वैदिक व सुमेरी वाङ्मयांत या उभयसमाजाच्या पूर्व- कालीन एकत्र वस्तीचे दर्शक उत्तरध्रवप्रदेशीय परिस्थितीचे द्योतक अशा प्रमाणांचे स्पष्ट उल्लेखहि सांपडतात. त्याअर्थी या लेखांकांत सिद्ध करण्यास घेतलेले प्रमेय बहु- तांशी सिद्ध झाले आहे, असेंच साचें एकमत होईल, अशी आशा वाटते. तथापि या लेखमालेचे धागेदोरे विवेचनाच्या भरांत इतक्या भिन्न शास्त्रांत जाऊन अडकले आहेत की ते एकत्र उपसंहृत केल्याशिवाय व त्यांच्या साह्याने विणलेला सिद्धांतपट एकरूप असा दाखविल्याशिवाय वाचकांना निश्चिततेचे समाधान वाटणार नाही. आणखी शेवटचा एक लेख लिहून या विषयाचा उपसंहार करूं व त्यावरून निघणारा अखेरचा सिद्धांत वाचकांपुढे स्पष्टपणे मांडून त्यांची रजा घेऊ. असा विचार केला आहे.