पान:हिंदीचलन पद्धतीचा इतिहास.pdf/62

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
अखेर सुवर्ण परिमाण त्याग

४१

हक्क जनतेस आहे; परंतु नोटा व रुपये देऊन आज सरकारी तिजोरींतून सोनें मिळणेंचा हक्क कायद्यानें जनतेस नाहीं, हो बेजबाबदारपणाची स्थिती हितकारक नाही, म्हणून ती नाहींशी करून तिच्या ऐवज रुपये व नोटा दिल्या असतां सरकारने लोकांस सोनें दिलें पाहिजे असें सरकारवर बंधन घालण्यांत यावें वहीं कामें व्यवस्थितपणे पार पडण्याकरितां येथें मध्यवर्ती बँक स्थापन करण्यांत यावी, हिल्टन यंग कमिशनने शिफारस केली होती त्यास अनुसरून १९३५ मध्ये सदर मध्यवर्ती बँकेची येथे स्थापना झाली.

" अखेर सुवर्ण परिमाण त्याग १९३१ ".

 सप्टेंबर १९३१ मध्ये बँक ऑफ इंग्लंडला नोटांच्या मोबदला सोनें देण्याची आपली जबाबदारी पार पाडणे कठीण झाल्यामुळे ब्रिटिश सरकारनें तिच्यामधून त्या संस्थेस मुक्त केले; आणि त्या कारणानें पौंडाचें स्थिर व निश्चित सुवर्ण परिमाण बंद झालें. तेव्हांपासून पौंडाची सोन्यांतली किंमत सास ८४ शिलिंग होती ती १४० ते १४८ शिलिंगापर्यंत गेली. ब्रिटिश चलनाचा सोन्याचा आधार ज्या दिवशीं सुटला, त्याच दिवश हिंदुस्थान सरकारने एक ऑर्डिनन्स काढून आपले रुपया चाही सोन्याशी असलेला संबंध तात्पुरता सोडल्याचे जाहीर केलें, यामुळे रुपयाची सोन्याच्या मानाची किंमत अस्थिर व अनिश्चित राहिली असती ( Rupee left to find its own level). परंतु ही गोष्ट ब्रिटिश ट्रेझरीस न आवडल्यामुळे भारतमंत्र्याचें हुकुमा- प्रमाणें हिंदुस्थान सरकारास दुसऱ्याच दिवशीं आदल्या दिवसाचा ऑर्डिनन्स रद्द करून रुपयाचा संबंध हेलखावे खाणान्या पौंडाशी १८ पेन्साचे दराने असल्याचा दुसन्या ऑर्डिनन्सने जाहीर करावें लागलें. यावरून हिंदुस्थान सर- कारने येथील प्रजेच्या हिताच्या दृष्टीने केलेली एकादी गोष्ट ब्रिटिश सर- कारास नापसंत असल्यास करतां येत नाहीं, हें स्पष्ट झालें; व येथील चलन- पद्धतीतले सर्व फेरफार ब्रिटनचे हिताचे दृष्टीने होतात ही हिंदी जनतेची तक्रार रास्त असल्यांचें जगाचे निदर्शनास आलें.