पान:हिंदीचलन पद्धतीचा इतिहास.pdf/61

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४०
हिंदी चलनपद्धतीचा इतिहास

चांदीच्या खाणींचे मालक आणि सराफ चिडून जातील आणि चीनमध्ये असंतोष उत्पन्न होईल; आणि या सर्व घडामोडीचे दुष्परिणाम खुद्द हिंदु- स्थानास भोगावे लागतील. अशा तन्हेच्या अपवादांवर जोर देऊन कमि शननें हिंदुस्थानांत सोन्याचें नाणें चालू करणें सर्व दृष्टीनीं अनर्थावह आहे, असा आपला अभिप्राय दिला.
 सदर कमिशनचे शिफारशीनुसार १९२७ साली कायदा करण्यांत आला व रुपयास १८ पेन्स हा हुंडणावळीचा दर कायम करण्यांत आला.

" मध्यवर्ती बँकेची आवश्यकता "

 औद्योगिक आणि व्यापारी व्यवहारांत खेळते भांडवल पुरविण्याचा धंदा प्रत्येक देशांत अनेक व्यक्ति आणि संस्था शेंकडों वर्षे करीत आहेत. त्यांची कामगिरी राष्ट्रीय हिताच्या दृष्टीने अधिक उपयुक्त व्हावी आणि सामाजिक संसार सुरळीत व सुखाने चालण्यास त्यांचें अधिकांत अधिक सहाय्य व्हावें हा मध्यवर्ती बँकेच्या घटनेचा व कार्याचा मुख्य उद्देश आहे.

" मध्यवर्ती बँकेचें कार्य "

 मध्यवर्ती बँकेचे कार्यः - मध्यवर्ती बँकेस मुख्य दोन महत्त्वाचीं कामें करावयाची असतात. नोटा कमी-जास्त प्रमाणांत काढून बाजारांतील चल- नाचें नियंत्रण करणें व बँकांच्या शिलकी रकमा एकत्रित आणून त्यांचे 'मदतीने सर्व देशांतील पैशाच्या व्यवहारांत एकसूत्रीपणा आणणें, हीं तीं कामे होत. हिंदुस्थानांत खुद्द सरकार आणि इंपीरियल बँक या दोहोंमध्ये ह्रीं दोन कामे वाटली गेली आहेत. आपल्या चलनी नोटा इम्पीरीयल बँकेनें काढलेल्या नसून त्या सरकारने काढलेल्या आहेत. पण व्यापारी कर्जे देऊन पत वाढविण्याचें व व्याजाचा दर कमीजास्त करण्याचें काम मात्र सरकार करीत नसून इंपीरियल बँक ( १९३५ ) पर्यंत करीत असे. यामुळे दोघांचे रिझर्व्ह किंवा रोख रकमा स्वतंत्र राहून राष्ट्रास त्यांचा योग्य फायदा मिळत नसे. वरील दोन कामें हिंदुस्थानांतही एकाच बँकेच्या स्वाधीन असावीत.
 तसेच हल्लीं सोनें देऊन नोटा व रुपये सरकारी तिजोरीतून मिळणेचा