पान:हिंदीचलन पद्धतीचा इतिहास.pdf/63

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४२
हिंदी चलनपद्धतीचा इतिहास
" रुपयाचा भाव स्टलिंगशी जोडणेंवर आक्षेप "

 रुपयाचा भाव स्टर्लिंगशी जोडण्याविरुद्ध हिंदी लोकमत असणेचें कारण कीं, १९३१ साली इंग्लंडने आपले कायदेशीर चलन जो पौंड, त्याचा सोन्याशीं असलेला संबंध सोडला व कागदी पौंड मोकळा सोडला. तेव्हां इंग्लंडमधील आर्थिक परिस्थिती जेणेंकरून सुधारेल अशी परिस्थिति निर्माण करण्याकडे चलनाचा ओघ रहाणार. इंग्लंडमध्ये वर्षांतील १० आठवडे देशास पुरेल इतकेंच धान्य पिकतें व लॅकेशावरच्या गिरण्यास लागणारा कापूस व इतर कच्चा माल, परदेशांतून आयात करावा लागतो. जगांतील बाजार पेठेत तेथील माल इतर देशांतील मालाचे स्पर्धेत यशस्वी होण्यास सदर मालाचें उत्पादन इतर देशाच्या शक्य तितकें कमी खर्चात हो आवश्यक असल्यामुळे कच्चा माल शक्य तितका स्वस्त मिळाला पाहिजे म्हणजे इंग्लंडची आर्थिक परिस्थिति सुधारू शकणार. तर उलटपक्ष हिंदुस्थान शेतीप्रधान देश असून धान्य व कच्चा माल यांना परदेशांत शक्य तितकी अधिक किंमत येण्यावर येथील शेकडा ७० टक्के जनतेची आर्थिक परिस्थिती अवलंबून आहे. असा इंग्लंड व हिंदुस्थान देशांतील परिस्थितीत भिन्न- पणा असल्यामुळे, रुपयाचा संबंध कागदी पौंडाशी जोडणें हिंदुस्थानचे हिताचें नाहीं. म्हणून तसें न करितां इंग्लंडमधील कागदी पौडाप्रमाणें रुपया मोकळा सोडावा (Rupee to find its own level) त्यांत हिंदु- स्थानचे हित आहे. अशी हिंदी जनतेने केलेली मागणी धुडकावण्यांत आली, च रुपया स्टलिंगशी जोडण्यांत आला.

"१९३१ सप्टेंबर नंतरचे बाजारभाव व परराष्ट्रीय व्यापार"

 लाहोर येथील सनातन धर्मकॉलेजचे अर्थशास्त्राचे प्रोफेसर श्रीयुत व्रज- नारायण यांच्या मतें “ जुलै १९१४ चे बाजारभाव (Index number) १०० घरल्यास १९३० मध्ये ११६ होते. परंतु ऑगस्ट १९३१ मध्ये ते ९२ पर्यंत घसरले. १९३१ सप्टेंबरमध्ये रुपयाचा सुवर्णाशी असलेला संबंध सोडून तो स्टर्लिन्गर्शी जोडण्यांत आल्यावर फेब्रुवारीपर्यंत ते पर्यंत चढले, परंतु तेव्हांपासून ते घसरू लागून १९३३ मार्चमध्ये ८२