पान:हिंदीचलन पद्धतीचा इतिहास.pdf/45

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रकरण दुसरें
हिंदी चलनपद्धती त्रोटक इतिहास.

 ब्रिटिश अमलापूर्वी हिंदुस्थानांत सोनें, रुपें व तांबें ह्या धातूंचीं नाणीं प्रायः चालत असत. होन, मोहरा, पुतळ्या हीं सोन्याची नाणी होत रुपये सर्व रुप्याचे, अल्प किंमतीची नाणी तांब्याचीं असत. ह्या निरनि- राळ्या धातूंच्या नाण्यांची परस्पर किंमत कायद्याने ठरविलेली नव्हती.सदर किंमती बाजारभावाप्रमाणे वारंवार बदलत.
 सोन्याची नाणी व रुपयाची नाणी ह्यांची परस्पर किंमत कायद्यानें ठरविलेली नसल्यामुळे बाजारभावाप्रमाणें जो किंमत असेल त्याप्रमाणें परस्पर मोबदला होई. शिवाजीच्या वेळेस, शिवराई, देवराई, रामनाथपुरी वगैरे नांवांच होन चालत असत. मोहरामध्येहि दिल्लीची मोहोर, औरंगबादी मोहोर, अशा नानाविध मोहरा प्रचारांत असत. येथे रुपयाचे नाणे फार पुरातन काळापासून चालू होतें.
 ( या देशांत नाणें फार प्राचीन काळापासून म्हणजे, वेदकाली, पाणिनी सूत्राच्या समयीं व महाभारताचे कालीं येथे नागें चालू होतें असें इति- हासावरून दिसते, १८व्या शतकांतल्या उत्तरार्धात येथे सोन्याची, चांदीची अशी निरनिराळ्या वजनाची व आकाराची ९९४ प्रकारची नाणीं चालूं होती असा उल्लेख सांपडतो.)
 एकोणिसावे शतकाच्या सुरुवातीस येथें सोन्याची व त्याबरोबरच रुपयासारखी चांदीचीं अनेक नाणी प्रचारांत होतीं. ह्या चांदीच्या व सोन्याच्या नाण्यांचे परस्पर प्रमाण देशांतील वेगवेगळ्या भागांत वेगवेगळे