पान:हिंदीचलन पद्धतीचा इतिहास.pdf/44

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
हुंडी - कमी खर्चाचा मार्ग

२३

विषम महर्गता झाली, आणि हुंडणावळीचे दर कायद्याचीं बंधने तोडून उच्छृंखल बनली. ही परिस्थिति सुधारणेकरितां १९३१च्या मध्यापासून बहुतेक सर्व देशांनी आपापल्या चलनांचा सुवर्णाशीं असलेला संबंध तात्पुरता सोडून आपापल्या चलनांच्या किंमती बऱ्याच उतरविल्या आहेत; व सुवर्णाचे निर्गतीवर बंधने घातली आहेत.
 येथपर्यंत चलन व हुंडणावळ विषयक सर्वसामान्य विवेचन झालें, यातां आपण हिंदी चलनपद्धतीचे इतिहासाकडे वळू.