पान:हिंदीचलन पद्धतीचा इतिहास.pdf/43

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२२
हिंदी चलन पद्धतीचा इतिहास

लागणारा खर्च ह्या गोष्टींचा विचार करून ठरवील. हाच नियम परराष्ट्रीय देण्याघेण्यास लागू आहे. मुंबईच्या एका कारखानदारानें विलायतेहून कांहीं यंत्रसामुग्री मागविली असल्यास, तो बँकेत जाऊन पैसे भरील आणि जरूर त्या पौंडांची हुंडी घेऊन तो लंडनला व्यापान्याकडे पाठवून देईल. विलायतेंत प्रचलित असलेलीं सोन्याची नाणी किंवा खुद्द सोन्याच्या चिपा त्याला स्थानिक बाजारांत बँकेच्या हुंडीपेक्षां स्वस्त मिळाल्यास तो हुंडाचे भानगडीत न पडतां सोनेच पाठवील.
 व्यापाराचा ओघ कमी जास्त जोराचा असेल त्या मानाने हुंड्या स्वस्त किंवा महाग असू शकतील; आणि हुंडणावळ वर खाली जाईल हैं उघड आहे. परंतु राष्ट्राराष्ट्रांमधील देणें-घेणें करण्याच्या कामी परराष्ट्रीय हुंड्यास एक जबरदस्त प्रतिस्पर्धी असतो, हे विसरता कामा नये आणि तो प्रतिस्पर्धी म्हणजे सोनें होय.
 एका राष्ट्रांतील नाणी दुसन्या राष्ट्रांत चालली नाहींत तरी सोन्यास चोहोंकडे मागणी असते, आणि राष्ट्रीय टांकसाळींत नाणी असल्यामुळे हुंड्यांच्या ऐवजी सोन्याची आयात आणि निर्यात करून पाडून घेणें सुलभ आंतरराष्ट्रीय देणी-घेणी भागवितां येतात.
 शांततेच्या व सुव्यवस्थेच्या काळांत, महायुद्धापूर्वी, चीन व हिंदुस्थान- खेरीज जगांतील बहुतेक सर्व देशांत सोन्याची नाणी पाडून देण्याच्या सरकारी टांकसाळी चालू असून सुवर्णीची आयात निर्यात अप्रतिबद्ध असे; आणि कागदी चलनांचे परिणाम मर्यादित असल्यामुळे त्याचे सोन्याचे नाण्यांत सहज रूपांतर होत असे. सर्व प्रमुख देशांत हीच व्यवस्था प्रचारांत असल्याकारणानें आणि कायदेशीर नाण्यांचे परस्पर संबंध सर्वश्रुत आणि स्थिर असल्याने आंतरराष्ट्रीय हुंडणावळीचे दर ठराविक मर्यादेबाहेर जात नसत. परंतु महायुद्धानंतरचे कालांत जेव्हां ( १ ) कागदी चलन बेसुमार खेळू लागून त्याचे सोन्यांत रूपांतर होऊ शकले नाहीं; ( २ ) टांकसाळीत सोन्याचीं नाग लोकांस पाहून देणें बंद झाले, आणि ( ३ ) सोन्याचांदीच्या आयात-निर्यातीवर सरकारचें नियंत्रण येऊन पडले, तेव्हां वरील व्यवस्थित चाललेले व्यवहार थांबले आणि निरनिराळ्या देशांत कमी अधिक प्रतीची