पान:हिंदीचलन पद्धतीचा इतिहास.pdf/102

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
चढत्या हुंडणावळीचे दराने हिंदुस्तानचे नुकसान

८१


काल देशांतील धारण स्वस्त झाल्यामुळे चढत्या हुंडणावळीचे दराने थोडाबहुत फायदा होतो ही गोष्ट खरी असली तरी बहुसंख्य वर्ग जो शेतकरी वर्ग याचीच, हलाखीची स्थिति झाल्यावर शेवटीं वरील वर्गासहि झळ पोहोचल्याशिवाय रहात नाही.   या शोचनीय परिस्थितीतून वर डोके काढणे असल्यास प्रथम शेतकरी वर्गाची परिस्थिति सुधारली पाहिजे. ती सुधारणे शेतक-याने उत्पन्न केलेले धान्य व कच्चा माल यांस भाव येण्यावर अवलंबून आहे. या मालास परदेशांत भाव येण्यास मार्ग, जगांतील सर्व राष्ट्रांनी यापूर्वीच प्रचारांत आणलेला महायुद्धपूर्वकालीन उतार हा होय. या उपायाने हिंदुस्थानांत आबादीआबाद होईल असे कोणीच म्हणत नाही. मंदीस उत्पादनांत बेसुमार वाढ, व्यापारी उलाढालींत भासणारी सोन्याची टंचाई वगैरे अनेक जागतिक कारणे आहेतच, पण उतरती हुंडणावळ थोड्या प्रमाणात का होईना पण या देशास हिताची झाल्याशिवाय राहणार नाही. हे खाली दिलेल्या ५ देशांतील बाजारभावावरून दिसून येईल.


देशाचे नांव १९२९ सालचे बाजारभाव १०० धरून त्याच्याशी हल्लीचे बाजारभावाशी प्रमाण. इंग्लंड ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड कानडा हिंदुस्थान ११ ।।।  यावरून हे स्पष्ट होत आहे की, ब्रिटिश साम्राज्यांतर्गत ऑस्टेलिया, कानडाःव न्यूझीलंड हे शेतीप्रधान देश:स्वयंशासित असल्यामुळे त्यांनी
 हिं...६