पान:हिंदीचलन पद्धतीचा इतिहास.pdf/103

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
८२
हिंदी चलनपद्धतीचा इतिहास

आपल्या चलनांच्या किंमती लोकांच्या हिताकरितां उतरविल्या व त्यामुळे तेथील बाजारभाव चढीचे राहिले.
 उलटपक्षी हिंदुस्थान परतंत्र असल्यामुळे येथील लोकांचे हिताच्या दृष्टीनें चलनाची किंमत जरूर तितकी न उतरविल्यामुळे येथील बाजारभाव वरील देशांचे मानानें स्वस्त राहिले. याचे कारण हिन्दुस्थान परतंत्र असल्यामुळे येथील चलनपद्धतीत फेरफार इंग्लंडचे हिताचे दृष्टीने होत असतात व येथील बाजारभाव शक्य तितके अधिक स्वस्त राहण्यावर या देशांतील कच्चा माल इंग्लंडला इतर देशातील मालाचे मानाने स्वस्तांत पडून इंग्लंड- मधील कारखानदारांना उत्पादन खर्च कमी पडणें व जगाचे बाजारांत इतर देशाचें मालाचे स्पर्धेत इंग्लंडच्या मालाचा टिकाव लागून इंग्लंड- मधील कारखाने चालूं राहणें हें अवलंबून असल्यामुळें, त्या दृष्टीनें हुंडणा- 'वळीचा दर कायम करण्याचे सरकारचे धारेण असतें, मग तो दर हिन्दु- स्थानास कितीही नुकसानीचा असो त्याची फिकीर सरकार कां करील ?
 १८ पेन्सचा रुपयाचा भाव ठेवल्यामुळे इंग्लंडचे उद्दिष्ट साधलें, हें वरील कोष्टकावरून इतर देशांचे मानाने येथील बाजारभाव स्वस्त राहिल्याचे उघड होत आहे.
 वरील विवेचनावरून १८ पेन्साचा रुपयाचा भाव हिन्दुस्थानचे हिताचा नाहीं व येथील बहुसंख्य वर्ग जो शेतकरी त्याची परिस्थिती सुधारणें अस- ल्यास त्यानें पिकविलेल्या मालास किम्मत येणेंकरितां रुपयाची किंमत १८ पेसावरून निदान १६ पेन्सावर तरी आणिली पाहिजे, म्हणजे बाजारभाव चढतील व पर्यायाने शेतकरी वर्गाची परिस्थिती कांहींशी सुधारण्याच्या मार्गास लागले, असे तज्ञांचे मत आहे.
 रूपयाची किंमत उतरविल्यास शेतकन्याचे मालास किमत आल्यामुळे त्याची क्रयशक्ती (Purchasing power) वाढेल व त्यामुळे येथील उद्योग धंदेही हल्लींपेक्षां बरे चालूं लागतील व पर्यायाने कामकरी लोकांचीहि परि- स्थिति सुधारण्याच्या मार्गाला लागेल. हिंदुस्थानांतील कापडाच्या गिरण्या व इतरही काही उद्योगधंदे यांजवर अलीकडे कांहीं कालापासून ओढवलेले