पान:हिंदीचलन पद्धतीचा इतिहास.pdf/101

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
८०
हिंदी चलनपद्धतीचा इतिहास

ह्याला असतां १२३ टक्केच नुकसान येतें असें नाहीं; तर त्यास यापेक्षां अधिक नुकसान येतें. त्यास सुमारे २० ते २५ टक्के तरी निदान नुकसान लागतें असें अनुमान करण्यांत आले आहे. ( हिंदुस्थानांत दर माणश वार्षिक उत्पन्न सरासरीने सर विश्वेश्वरय्या यांचे मतें ५५ ते ८२ रुपयाचे आसपास आहे. यावरून तें किती अल्प आहे हे उघडच आहे. त्यांत शेतकन्याला शेकडा २५ इतकी घट लागली म्हणजे हें सांपत्तिक चित्र किती भेसूर दिसतें याचा विचार ज्याचा त्यांनी करावा ) याचा परिणाम असा होतो की वर्षभर शेतांत राबून देखील त्यांत उत्पन्न होणारे पीक धान्याचे भाव मंदावल्यामुळे, शेतसारा देणेसही अपुरे पडतें, व अशा रीतीनें सरकारी बाकी थकते, सावकारी देणें फिटत नाहीं, व याचे पर्यवसान शेता- भाताचा व घरादाराचा लिलाव होणेंपर्यंत होतें. शेतावर उपजीविका होत नाहीं म्हणून शेवटीं कांहीं शेतकन्यांवर शेती सोडून देऊन आसपासचे शहरांतील कारखान्यांत मजुरी करण्यकरितां आपले गांव सोडून जाण्याचा प्रसंग ओढवतो. परंतु तेथेहि कारखानदारास परदेशच्या मालाच्या स्पर्धेमुळें आपले कारखाने चालविणें परवडत नाहींसें झाल्यामुळे शेतकन्यास कामधंश मिळणें कठीण पडतें, व त्यांची तेथे पूर्वीच्या असलेल्या कारखानदारांनी कमी केलेल्या कामकरी वर्गात भर पडून 'मागणी व पुरवठा' या न्यायानें, मागणीपेक्षां मजुरांची संख्या वाढल्यामुळे सर्वसाधारण मजुरीचे दर उतरतात व याचा परिणाम कामकरी वर्गाने केलेल्या संपांत कामकन्यांना अपयश येण्यांत होतो. कारण हे बेकार लोक कमी पगार घेऊन कामावर जाण्यास तयार असतात व अशा रीतीनें सर्वोच्च नुकसान होतें.
 हिंदुस्थानांत शेकडा ७०-७५ टक्के लोकसंख्या शेतकरी, कामकरी यांच वर्गातील असल्यामुळे आणि या वर्गाची अशी हलाखीची स्थिति झाली म्हणजे येथील देशांत तयार झालेला माल खपणे कठीण पडून शेवटी कारखाने बंद पडण्यापर्यंत पाळी येते; व अशा रीतीने दारिद्र्याची छटा सर्व देशभर पसरलेली दिसते, ज्यांस परदेशी माल खरेदी करावयाचा आहे किंवा जे प्रत्यक्ष घनोत्पादक नाहींत म्हणजे देशांतील सरकारी व बिनसरकारी नोकरवर्ग, व्याज मिळविणारे सावकार, वकील, डॉक्टर्स वगैरे लोकांचा कांहीं