पान:हिंदीचलन पद्धतीचा इतिहास.pdf/100

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
चढत्या हुंडणावळीचे दरानें हिंदुस्थानचे नुकसान

७९

चढत्या हुंडणावळीचे दरानें हिंदुस्थानचें नुकसान.

 हिंदुस्थान शेतीप्रधान देश आहे. येथील सुमारें७० टक्के लोकवस्ती शेतीचे धंद्यावर अवलंबून आहे व धान्य आणि कच्चा मालच प्रामुख्यानें येथून परदेशी पाठविला जातो. तेव्हां धान्य व कच्चा माल यांना चांगला भाव येण्यावर हिंदुस्थानची सांपत्तिक परिस्थिति अवलंबून राहणार हे उघड आहे.
 हिंदुस्थानचे शेतकऱ्यांनी जो माल पिकविला, त्याची त्यास जगाचे बाजा - रांत ठरेल तीच किंमत मिळणार हे उघड आहे. आपण अशी कल्पना करूं कीं, शेतकऱ्यांस इंग्लंडमध्ये १०० खंडी विकलेल्या गव्हाची किंमत म्हणून १०० पौंड मिळाले. रुपयाचा भाव १६ पेन्साचा असतांना त्याचे हातीं येथें १५०० रुपये मिळाले असते तेथें आतां १८ पेन्साचे भावामुळे त्याचे हातांत १३५० रुपयेच येतात. म्हणजे त्यास हे १५० रुपये कमी कां मिळाले? त्याचा गहूं पूर्वीपेक्षां कमी दर्जाचा होता म्हणून मिळाले काय ? नाहीं. तर केवळ हुंडणावळीचा भाव १६ पेन्सावरून १८ पेन्सावर चढविण्यांत आल्यामुळे शेतकरी १२३ टक्क्याने बुडाला. बरें त्याने उत्पन्न केलेल्या धान्याची किंमत त्यास १२ टक्क्यानें आतां कमी मिळाली. म्हणून त्यास सरकारसारा १६ पेन्खाचा रुपयाचा भाव असतांना द्यावा लागत होता तेव्हांपेक्षां १८ पेन्साचा भाव झाला असतां १२ टक्क्याने कमी देतां येतो कां नाहीं. सरकारसारा त्यास पहिल्याइतकाच द्यावा लागतो. शेतकन्यास असलेल्या कर्जाचे व्याज व मुद्दलाचा हप्ता यांत साव- काराकडून त्यास १२३ टक्के सूट मिळते कां १ नाहीं. बरें सदर शेतकऱ्यास कांही कामानिमित्त तालुक्याचे अगर जिल्ह्याचे ठिकाणी जाणें आहे, तसेंच त्यास आपला माल विक्रीकरितां आपले खेड्याहून जिल्ह्याचे ठिकाणीं अगर दुसरीकडे कोठें रहेवेनें पाठवावयाचा आहे, अगर परदेशी बोटीनें पाठवावयाचा आहे, तर त्यास हवे कंपनीकडून अगर आगबोट कंपनीकडून रुपयाचा भाव. १६ असतांना जितका आकार घेण्यांत येत होता त्यापेक्षां १८ पेन्साचा भाव झाला असतां १२३ टक्के आकार कमी पडतो का ? नाहीं, म्हणजे याचा अर्थ असा की, शेतकऱ्यास १६ पेन्साऐवजी १८ पेन्साचा रुपयाचा भाव