पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/८५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

८० स्वामी विवेकानंद यांचे समन ग्रंथ.[ नवमः

यत्किंचितही बदल झालेला नाही. त्याचप्रमाणे वस्तुतः तो विश्वरूपही झालेला नाही. परमात्मा विश्वरूप झाला असे आपणास वाटते याचे कारण हेच की देश, काल. आणि कारण या उपाधित्रयांतून आपण परमात्मरूपाकडे पाहत असतो. यामुळे परमात्मरूप जसे आहे तसे आपणास न दिसतां या उपाधीमुळे भलताच देखावा आपण पाहत असतो. जेथे वस्तुतः भेद नाहीं, तेथे अनेक भेद आणि अनेक रूपें बाह्यतः दिसू लागतात; पण खरोखर तेथे भेद नाहीत आणि अनेक रूपेंही नाहीत. ही उपपत्ति विलक्षण धीटपणाची आहे यांत शंका नाही. आतां सारांशरूपाने सांगितलेल्या या उपपत्तीचे विवेचन अधिक विस्ताराने करणे अवश्य आहे.
 ही उपपत्ति म्हणजे निवळ कल्पनेचे साम्राज्य आहे अशांतला भाग नाही. कल्पनातरंग म्हटला म्हणजे त्यांत सत्याचा अंशही नसावयाचा असे आपण आगाऊच गृहीत धरीत असतो; पण ही कल्पनासुद्धा त्याच किंमतीची आहे असे समजू नका. या विश्वाला मुळी अस्तित्वच नाहीं असें अद्वैतमताचे प्रतिपादन नाही हे अगोदर पक्के ध्यानांत धरा. विश्वाला अस्तित्व अवश्य आहे, पण ज्या रीतीने ते आपणास दिसते तसें मात्र ते नाही इतकेच. आपणाला जे त्याचे स्वरूप म्हणून प्रतीत होते ते स्वरूप सत्य नाही इतकेंच वेदान्ताचे म्हणणे आहे. या मताचे स्पष्टीकरण करतांना जी उदाहरणे अद्वैतग्रंथांनी सांगितली आहेत ती सर्वांस ठाऊकच आहेत. रात्रीच्या अंधाराच्या वेळी एखाद्या कलेल्या झाडाच्या बुंधक्याकडे पाहून भुताखेतांच्या अस्तित्वावर विश्वास ठेवणारा भोळसर मनुष्य हे भूतच आहे असे समजतो; तेंच बुंधके एखाद्या चोराला पोलीसच्या शिपायासारखे दिसते, तिला एखाद्याला तो आपला मित्रच उभा आहे असे वाटते. या उदाहरणांत बुंध एकच असतां त्याची किती रूपें निर्माण झाली पहा ! बुधक्याचे रूप में आरंभी होतें तेंच अखेरपर्यंत कायम होते. कोणत्याही प्रसंगी यत्किंचितही बदल त्यांत झाला होता असें नाहीं; आणि अशा प्रकारे त्याच्या स्वरूपांत वास्तविक कोणताही बदल झाला नसतां तिघांना तीन प्रकारची रूपें तेथें प्रतीतीस आली हेही खोटे नाही. म्हणजे बुधक्याच्या रूपांत वस्तुतः बदल झाला नसतां बाह्यतः अनेकवार त्यांत बदल झाल्यासारखे दिसते. मग बदल झाल्याचा हा देखावा निर्माण झाला कसा ? प्रेक्षकांच्या चित्तांत जी रूपें अगोदरच अस्तित्वांत