पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/६१

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

५६ स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ. [ नवम

मात्र घेऊन आपल्या मेंदूची हालचाल इच्छा करीत असते. तुमच्या शरिराच्या ज्या हालचाली होतात त्या तुमची इच्छा करीत नाही, त्याचप्रमाणे विश्वाची घडामोडही इच्छा करीत नाही. ज्या मूलतत्त्वाच्या अनुरोधाने शरिराच्या हालचाली होतात, त्या तत्त्वाचा इच्छा हा एक लहानसा अंश मात्र आहे. त्या तत्त्वाचा एक भाग इच्छा या रूपाने प्रकट झाला आहे. हा पिंडांतील सिद्धांत ब्रह्मांडांतही खरा आहे. विश्वांतील समष्टिरूप इच्छा ही विश्वाचा एक भाग आहे. समष्टिरूप इच्छेच्या पोटी विश्व नांदत नसून विश्वाच्या पोटी इच्छा नांदते. विश्वाची घडामोड इच्छेच्या अनुरोधाने चालत नाही. विश्व आणि इच्छा यांची परस्पर तुलना करावयाची म्हटले तर विश्व हे समष्टिरूप आणि इच्छा व्यष्टिरूप म्हणता येईल. याकरितां इच्छेनें विश्व निर्माण झाले अथवा इच्छेनें तें चालतें हे म्हणणे सर्वथा चुकीचे होईल. इच्छेची ही उपपत्ति ग्राह्य केली तर साऱ्या विश्वाच्या कोड्याचा निर्वाह तीत होत नाही. माझा हा देह माझ्या इच्छेप्रमाणे चालतो, हालतो असें मी मानले तर एखादी वेळ अशी येते की तेव्हा माझ्या इच्छेला न जुमानतां माझा देह वावरू लागतो; आणि असे झाले म्हणजे मीही संतापून केस तोडूं लागतो; पण यांत वास्तविक अपराध कोणाचा ? अपराध माझाच; कारण इच्छेनें अमुक घडते असे गृहीत करावयास मला काय कारण होतें ? त्याच प्रमाणे विश्व परमेश्वराच्या इच्छेनें चालतें हे म्हणणे मी गृहीत केले आणि अनुभव उलटा येऊ लागला तर तो अपराधही माझाच होय. या विश्वाचें आदिकारण जो पुरुष तो इच्छा नव्हे; आणि त्याचप्रमाणे तो बुद्धिही नव्हे. कारण बुद्धि ही वस्तुसुद्धा संघटित आहे. ती स्वयंभू नव्हे. जड मेंदूच्या साहाय्यावांचून बुद्धीला अस्तित्व असू शकत नाही. जड मेंदू आणि बुद्धि यांचा चिरसंयोग आहे. जेथे जेथें म्हणून बुद्धीचा प्रत्यय येईल तेथे तेथे मेंदूच्या जातीचा कांही पदार्थ असलाच पाहिजे. याच पदार्थाची घटना विशिष्ट आकाराने होते आणि मेंदूचे उद्दिष्ट कार्य ती करूं लागते. जेथे जेथें बुद्धि म्हणून आहे तेथे तेथें मेंदूचे घटक कोणत्याना कोणत्या रूपाने असावयाचेच. बुद्धि ही स्वतःच संघटित वस्तु आहे, तर मग पुरुषाचे स्वरूप तरी काय ? या प्रश्नाचे उत्तर हेच की तो इच्छारूप नव्हे अथवा बुद्धिरूपही नव्हे; तर या साऱ्या रूपांचें तो कारण आहे. तो कार्यरूप नसून कारणरूप