पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२९३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२८८ स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.[नवम


होम न होईल तर त्या मनःपुष्टीचा काय उपयोग? तुमचा देह आणि तुमचे मन यांचा व्यय जगत्कार्यासाठी न होईल तर त्यांचे लालनपालन फुकट केलें असें होईल. या एका क्षुद्र देहाला महत्त्व आणण्यासाठी धडपड करण्या पेक्षा लक्षावधि बांधवांच्या कल्याणासाठी त्याचे बलिदान करणे तुम्हांस श्रेयस्कर आहे. संन्यासधर्माचें हैं ध्येय आहे, आणि हे साधण्याकरिता आपल्या आयुष्याच्या प्रत्येक क्षणी तुम्ही मरत राहिले पाहिजे. अशा प्रका रच्या मृत्यूंतच मुक्ति आहे. सर्व कल्याण त्यांत सांठविले आहे. आणि याविरुद्ध असलेला मार्ग म्हणजे अधोगतीचा मार्ग होय. संन्यासधर्माचें साध्य काय याचा विचार येथवर झाला. आता ते कोणत्या मार्गाने सिद्ध होईल याचाहि विचार केला पाहिजे. साध्य असाध्य कोटीतले असूं नये हे प्रथम लक्षात ठेवले पाहिजे. राष्ट्रापुढे अत्युच साध्य ठेवले तर ते सिद्ध न होतां राष्ट्र उलट दुबाळे होऊन अधोगतीच्या मागीला लागते. बौद्ध आणि जैन धर्माचा प्रसार हिंदुस्थानांत झाल्यानंतर येथे असाच प्रकार घडून आला. याकरितां आपलें साध्य अत्युच्च कोटींतले असूं नये. पण याबरोबरच आणखोहि एक गोष्ट लक्षात ठेविली पाहिजे ती ही की आपली दृष्टि निवळ व्यवहारीहि असू नये. कल्पनेची थोडीशीहि भरारी तुमच्याजवळ नसेल आणि विशेषेकरून अवश्य असे एखादें साध्य तुमच्या मार्गदर्शकाच्या जागी नसेल तर तुमची किंमत पशुहून अधिक नाहीं असें होईल. केवळ देहपरिचर्या चालविण्याचे काम पशुहि करितो. याकरिता आपल्या नजरेपुढे काही उच्च साध्य सदोदित असले पाहिजे आणि त्याबरो बरच व्यवहारहि पाहिजे. महत्त्वाचा मुद्दा इतकाच की, कोणत्याहि बाबीचा अतिरेक होऊ देऊ नये. आमच्या जुन्या दृष्टीने पाहतां आमचे साध्य म्हटले म्हणजे पर्वताच्या गुहेत ध्यानस्थ होऊन बसावें आणि एके दिवशी मरून जावें हेच होते. पण हा मार्ग चुकीचा आहे. सर्वांना मागे टाकून आपण एकटेंच पुढे जाऊं पहाणे चुकीचे आहे. फार काय, पण अशा रीतीने चाल ण्यांत अखेरीस यशहि येत नाही असा अनुभव प्रत्येकाला पुढे येतो. दुस न्याच्या मुक्तीसाठी धडपड करण्यांतच आपणांसहि मुक्ति लाभ होतो हे तत्त्व केव्हांना केव्हां तरी प्रत्येकाच्या अनुभवास आल्यावांचून राहणार नाही. याकरितां व्यवहार सोडूं नका. व्यवहाराचा सारा खटाटोप करीत ,