पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२९२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

संन्याशाचें ध्येय आणि त्याचा अभ्यास.

**********

(बेलूर मठांतील तरुण संन्याशांनी दिलेल्या मानपत्रास उत्तर.)

लांबलचक भाषण करण्याचा हा प्रसंग नव्हे. संन्यासधर्म योग्य रीतीने पाळण्याकरितां तुमचा प्रत्यक्ष आचार कसा असावा याचे वर्णन मी थोड क्यांत करणार आहे. संन्यासमार्गाचे ध्येय काय आहे हे प्रथम समजणे अवश्य आहे. हे साध्य समजल्यानंतर त्याची सिद्धि कोणत्या मागीने होईल हेहि जाणले पाहिजे. तुमच्यापैकी जे संन्यासी असतील त्यांनी परहितावि षयीं नेहमी दक्ष राहिले पाहिजे. कारण, खरा संन्यासधर्म तोच. संन्यास अथवा त्याग म्हणजे काय याचे लांबलचक विवरण करण्यास आज मला वेळ नाही, तेव्हां हा अर्थ अगदी थोडक्यात सांगावयाचा म्हटले तर तो 'मृत्यूविषयी प्रेम' या शब्दांनी सांगता येईल. संसारी माणसें जगण्याची हांव धरितात, लांबलचक आयुष्य आपणांस कसे प्राप्त होईल या गोष्टीचा विचार ती नित्य करीत असतात. संन्यासधर्म याच्या उलट आहे. संन्या शाने मृत्यूवर प्रेम केले पाहिजे. तर मग आम्ही आत्महत्या करावी की काय असा प्रश्न तुम्ही कराल त्याला नकारात्मकच उत्तर मला दिले पाहिजे. आत्महत्या ही मृत्यूच्या प्रेमाची निदर्शक नाही. मृत्यूला कडकडून भेटावें म्हणून कोणी आत्महत्या करीत नाही. एखाद्याने आत्महत्या करण्याचा यत्न केला आणि तो फसला तर या फंदांत तो पुनः पडत नाही, असा अनुभव शेंकडों वेळां आला आहे. तर मग मृत्यूविषयी प्रेम म्हणजे काय ? सत्का -यासाठी देहदानाचीहि तयारी असणे हेच मृत्यूविषयीं खरें प्रेम होय. आ पल्या प्रत्येक कृतींत त्याग असणे हा स्वतःस मृत्यूकडे नेण्याचा मार्ग आहे. जी बुद्धि आज देहाला चिकटून बसली आहे ती पूर्ण नष्ट करणे हेच खरें मरण. आपल्या खाण्यापिण्यांत आणि इतर बारीकसारीक कर्मातसुद्धा त्यागाची भावना आपण सदोदित जागी ठेविली पाहिजे. शरीर पुष्ट व्हावे म्हणून तुम्ही अन्न भक्षण करितां पण परहितासाठी त्याचा होम करण्याची तुमच्या चित्ताची तयारी नसेल तर तें शरीर पुष्ट केल्याचा उपयोग काय ? अनेक ग्रंथ वाचून आपले मन तुम्ही पुष्ट करितां, पण जगाच्या हितासाठी त्याचा