पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२७४स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.[ नवम


चालू असतां ज्या मातीतून तो उगवला, तिच्यासारखा तो होत नाहीं; ज्या खताने त्याला पोसलें त्याच्या सारखा तो होत नाहीं; जे पाणी तो प्याला, त्या पाण्यासारखाहि तो नसतो आणि ज्या हवेत तो वाढला, त्या हवेसारखेंहि त्याचें स्वरूप नसते. तो आत्मभाव सोडीत नाही, तो स्वस्वभावानुरूप वाढतो. जमिनींतील, खतांतील, पाण्यातील आणि हवेतील पोषक द्रव्ये तो घेतो; पण त्यांपैकी कोणासारखाहि स्वतः न होता तो आत्मरूप कायम ठेवूनच वाढतो. या वृक्षाचे अनुकरण तुम्ही करा. दुसऱ्यापासून शिकण्यासारखें असेल तें अवश्य शिका. ते आपण शिकलेच पाहिजे. मी सर्वज्ञ अशी घमेंड ज्याला झाली, तो जिवंत असतांच मेला आहे असे समजा. याकरितां दुस -यापसून शिकण्याची बुद्धि सदोदित कायम ठेवा पण कोणाचे अनुकरण मात्र करूं नका.
 'आददीत परां विद्या प्रयत्नादवरादपि । अंत्यादपि परं धर्म स्त्रीरत्नं दुष्कुलादपि !' असें भगवान् मनूंचे वचन आहे. ज्ञान कोणापासूनहि घ्यावें. चांडालाचीहि सेवा करून मुक्तिमार्ग मोकळा करून घेण्यास हरकत नाही. या वचनाला अनुसरून जे जे काही चांगले असेल ते परक्यांपासून आपण अ वश्य ध्यावें; पण त्याच्या प्राप्तीसाठी परक्यांच्या मागे न जातां तें ज्ञान आपण आपल्या घरी आणावें, आणि आपल्याच पद्धतीने त्याचे ग्रहण करावें. तें ज्ञान आपण आपल्या ठिकाणी मुरू द्यावें. तथापि असें करीत असतां आपल्या मूळ भावांत फरक होऊ देऊ नये. आपण दुसऱ्यासारखे होऊ नये. आपला जुना जीवितक्रम सोडून कोणी फरफटत ओढल्यासारखे दुसऱ्याच्या मागे जाऊ नये. उद्या साऱ्या हिंदी लोकांनी परकीयांसारखा पोषाख केला, त्यांचे भक्ष्यपेय उचलले आणि त्यांच्या चालीरीतींचे अनुकरण केले, तर हिंदुस्थानाचे कोटकल्याण होईल हा भ्रम आधी सोडून द्या. तुमच्या रक्तांत किती हजार वर्षांचे ज्ञान खेळत आहे हे एका परमेश्वरालाच ठाऊक ! एका विशिष्ट प्रणालीतून आज हजारों वर्षे ते तुमच्या धमन्यांतून वहात आहे. या परंपरेला प्रारंभ केव्हां झाला तें देव जाणे! अशा प्रकारचा हा प्राचीन आणि प्रचंडतम प्रवाह आतां महासागराला मिळाला असतां तो परत हिमाचलाच्या शिखराला जाईल अशी अपेक्षा तुम्ही कशी धरितां ? ही गोष्ट सर्वथा अशक्य आहे. असें करण्याचा यत्न निष्फळ आहे, एवढेच नव्हे. तर त्यांत तुमचें