पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२८०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

खंड] हिंदु धर्मातील सामान्य सिद्धान्त. २७५


नुकसानहि आहे. तुमच्या असल्या खटपटीने तो प्रवाह शतधा विदीर्ण मात्र होईल. याकरितां, हा जीवनप्रवाह आपल्या नियुक्तमागाने अविरत चालेल, असे करणे इतकेंच तुमचे काम आहे. या प्रचंड ओघाच्या मार्गात जे मोठे शिलाखंड आडवे पडले आहेत ते दूर करून त्याचे पात्र निष्कंटक करणे इत केंच तुमचे काम आहे. हा मार्ग स्वच्छ करण्याचे काम तुम्हीं केलें म्हणजे तो प्रवाह अगदी स्वाभाविकपणे आपल्या मार्गाने जाईल; आणि असे होण्या तच तुमचे आणि तुमच्या भावी पिढीचे कल्याण आहे. उन्नतीच्या मार्गात आपले पाऊल दिवसेंदिवस पुढे पडावें असें तुम्हांस वाटत असेल, तर पूर्वोक्त मार्गाने जाण्यावांचून तुम्हांस गत्यंतर नाही.
 हिंदुस्थानांत आपणांस जै धर्मकार्य करावयाचे आहे, त्याची ही थोडीशी रूपरेषा तुम्हांस मी दर्शविली आहे. आपले कार्य फार प्रचंड आहे. आप णांस जी महत्कार्यें करावयाची आहेत, त्यांची चर्चा वेळाच्या अभावी आज मला करितां येत नाही. उदाहरणार्थ जातिभेद हा एक मोठाच प्रश्न आपणां पुढे आहे. याचा सांगोपांग विचार मी आज सारा जन्मभर करीत आलों आहे. हिंदुस्थानांतील बहुधा प्रत्येक प्रांतांत या प्रश्नांतील अडचणींचे स्वरूप काय आहे हेहि मी पाहिले आहे; आणि इतके करूनहि यांतील रहस्याचा उलगडा मला अद्यापि झालेला नाही. जातिभेदाच्या पोटांत वस्तुतः काय आहे, हे माझ्या बुद्धीला अद्यापि जाणतां आलें नाही. याचा विचार मी जों जो अधिक करितों, तो तो माझी बुद्धि अधिकाधिक भांबावून मात्र जाते. आतां इतके करून मला जो थोडा फायदा झाला तो हाच की, या विष याची अंधुक अंधुक दिशा मात्र माझ्या लक्षात आली आहे. जातिभेदाप्रमा णेंच अन्नोदकव्यवहाराचा प्रश्नहि आपणांस महत्त्वाचा आहे; आणि तोहि तितकाच अवघड आहे. तेंहि एक मोठे कोडें आहे. यांत मोठा महत्त्वाचा मुद्दा नाही असे समजून आपण थट्टेवारी तो उडवून देत असतो, पण आप णांस वाटते तितका तो निरुपयोगी नाही आणि सोपाहि नाही. सध्या मला इतकेंच म्हणता येईल, की या बाबींत जी रूढि म्हणून आपण अनुसरतों, ती मात्र खरोखर विक्षिप्तपणाची आहे. ती शास्त्राच्या रहस्याविरुद्ध आहे. अन्नो दकाची शुद्धि वस्तुतः कशी असावी यासंबंधी जे निर्बध शास्त्राने घातले आहेत, ते लक्षात न आणितां आणि त्यांचे अंतःस्वरूप न पाहतां केवळ त्या