पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

खंड] हिंदु धर्मातील सामान्य सिद्धान्त. २७३


सर्वांत भयंकर होय. मी कःपदार्थ अशी भावना ज्याच्या चित्तांत उत्पन्न झाली, त्याच्या मस्तकावर तो वज्रपातच झाला आहे, असे समजा, त्यांतून तो पुनः उठेल अशी आशाच नको. 'पै अमृतही नावडे । ऐसें जिव्हेलि – अरोचक पडे । तें मरण आले रोकडे ! हैं सांगावें काई ॥ आपल्या पूर्वजांची लाज ज्याला एक वार वटू लागली त्याचे मरण पाठीशी येऊन ठेपलें आहे असे समजा. मी त्या उज्ज्वल हिंदुवंशांतला एक रजःकण आहे, पण त्या वंशाचा अभिमान मला आहे. माझ्या पूर्वजांबद्दल माझ्या मनांत अत्यंत पूज्यबुद्धि आहे. मी हिंदु आहे असे सांगण्यांत मला धन्यता वाटते. तुम्हां हिंदुवंशजांच्या पायाचा एक क्षुद्रसा चाकर म्हणवून घेण्यांत मला मह दानंद होतो. तुमचा मी देशबंधु आहे. असें म्हणविण्याहून अधिक कशांतच मला धन्यता वाटत नाही. तुम्ही मंत्रद्रष्टयांचे वंशज, तुम्ही महर्षीचे कुल दीपक, जगानें पूर्वी कधीहि न पाहिलेली संस्कृति ज्यांनी आकाराला आणली त्यांच्या कुलांत तुम्ही जन्म घेतला. त्या तुमचा दासानुदास म्हणवून घेण्या पेक्षा अधिक अभिमानास्पद तें काय असणार ? आपल्या पूर्वजांकडे पहा आणि त्यांच्या कृति ध्यानांत आणून स्वतःच्या कर्तबगारीवर तुमची श्रद्धा असू द्या. त्यांची कृति तुम्हांस लाजविण्यासारखी आहे की अभिमान बाळ गण्यासारखी आहे, याचा विचार आपल्या मनाशी करून पहा. कांहीं झालें तरी दुसऱ्यांचे अनुकरण करूं नका, ही माझी तुम्हांस हात जोडून विनंति आहे. तुम्ही दुसऱ्यांच्या टाचेखाली गेला, म्हणजेच खरोखर तुमचे स्वातंत्र्य नष्ट होते; आणि दुसऱ्यांच्या अनुरोधाने कोणतेही कार्य-धर्मकार्य सुद्धा करण्याची दुष्ट खोड तुम्हांला लागली की, तुम्हांला स्वतंत्रपणे विचारसुद्धां करता येत नाही. याकरितां तुमचे स्वतःचे म्हणून जे काही आहे तेंच स्व प्रयत्नाने प्रत्यक्ष सृष्टीत आणा. दुसऱ्याचे काही चांगलें तुम्हांस दिसले तर त्याचाहि संग्रह करा, पण कोणाचे अनुकरण मात्र करूं नका. परक्यांपासून आपणांस कांहींच शिकावयाचें नाहीं असें नाहीं; पण शिकणे वेगळे आणि परावलंबी बुद्धीचे अनुकरण वेगळे. आपण बी पेरलें, त्याला खत घातले आणि पाणी दिले म्हणजे कालेंकरून त्याला अंकुर फुटूं लागतात. कालांत राने त्या बाल अंकुराचा महावृक्ष होतो. शाखापल्लवांनी तो मनोहर दिसूं लागतो; आणि अनेकांचें तो विश्रामस्थान होतो. पण त्याची वर्धनाची क्रिया

स्वा० वि० ख०-९-१८. -