पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२७० स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.[ नवन


 याकरितां दुस-यांचे दोष शोधू जाण्यापूर्वी आपल्या स्वतःच्या स्थितीचा विचार आपण आधी करावा. दुस-यांची धडपड झाली तरी ती सत्यवस्तूच्या शोधासाठीच असते. सत्यवस्तूचा अनुभव आपण प्रत्यक्ष ध्यावा यासाठीच यांची सारी खटपट असते. याकरिता त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊं देणे अधिक बरें; आणि त्यांना सत्यवस्तूची भेट झाली म्हणजें वेगवेगळा प्रत्येक मार्ग वस्तुतः हेच सांगत होता असा अनुभव त्यांना येईल. पद्धत वेगळी झाली तरी प्रत्येक मंत्रद्रष्टा अखेरीस येथेच पोहोचला असें त्याला कळून येईल. अशा स्थितीत प्रेममय वाणीवांचून दुसरा शब्द त्यांच्या तोंडून बाहेर येणार नाही. कारण शुद्ध प्रेममयाचा प्रकाश त्यांच्यांत ओत प्रोत भरून गेलेला असतो. फक्त याच स्थितीत रागद्वेषादि विकार पूर्ण वि लयास जातात; आणि येथेच श्रेष्ठत्व कनिष्ठत्वाचा वाद कायमचा विराम पावतो. येथे फार झाले तर फक्त हिंदु इतकीच संज्ञा कायम उरते. हिंदु मात्र आपला बंधु असें आपणांस वाटू लागते. अशी स्थिति तुम्हांस प्राप्त झाली तरच हिंदु हे तुमचें नांव यथार्थ होईल. हिंदु या शब्दाच्या नुसत्या उच्चारा बरोबर अनंत शक्तीचे वारे तुमच्या अंगांत अशा स्थितीतच संचरेल. हिंदु स्थानांतील यच्चयावत् रहिवासी आपला सखासोयरा आहे, असें तुम्हांस वाटू लागेल. भाषाभेद, प्रांतभेद अथवा जातिभेद असल्या क्षुल्लक कृत्रिम वस्तूंना तुमच्या चित्तांत थारा मिळणार नाही. कोणाहि हिंदूवर संकट आले तर तें आपणावरच आले आहे असें ज्या दिवशी तुमच्या अंतःकरणाला वाढू लागेल, त्याच दिवशी हिंदु या नांवाला तुम्ही खरोखर पात्र व्हाल. हिंदुमात्राच्या सुखासाठी गुरु गोविंदसिंगाप्रमाणे आपल्या सर्वस्वाची आहुति देण्याची तुमची तयारी ज्या दिवशी होईल, त्याच दिवशी तुमचें हिंदु हें नांव यथार्थ होईल. गुरु गोविंदसिंगाला देशत्याग करावा लागला. जुलमाविरुद्ध प्रचंड युद्ध करावे लागले; स्वतःच्या रक्ताची तिलांजली त्याला द्यावी लागली; स्वतःची संतति रणभूमीवर अखेरची निद्रा घेत असलेली त्याला पहावी लागली; आणि हे सर्व ज्यांच्यासाठी त्याने केले तेहि अखेरीस त्याला सोडून गेले. असले देखावे स्वतःच्या डोळ्यांनी पाहून हा सिंह रणांगण सोडून एकां ताच्या आश्रयाला गेला. आणि देहविसर्जन करीपर्यंत कोणाविरुद्ध एक शब्दहि आपल्या मुखाने त्याने उच्चारला नाही. जे त्याच्याशी कृतघ्नपणे वागले त्यां-