पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

खंड.] हिंदु धर्मातील सामान्य सिद्धान्त. २७१


नाहि त्याने शाप दिला नाही. तुम्हांला खरोखर कांहीं देशसेवा करावयाची असेल तर तुम्हांपैकी प्रत्येकाने साक्षात् गुरु गोविंदसिंग बनले पाहिजे. आ पल्या देशबांधवांत हजारों दोष तुम्हांस दिसत असतील, पण त्यांपैकी प्रत्येक हिंदुवंशांतला आहे हे ध्यानात ठेवा. यांपैकी प्रत्येक जण तुमचा चालता बोलता ईश्वर आहे. प्रत्येकाची पूजा तुम्ही केली पाहिजे. त्यांच्यापासून तुम्हाला अनेक प्रकारे उपद्रव होत असला, तरी तो सगळा गिळून त्यांच्या सेवेला तुम्ही स्वतःस वाहून घेतले पाहिजे. त्यांपैकी प्रत्येक जण तुम्हांस शाप देत असला, तरी तुम्ही प्रत्येकाची भक्तिच केली पाहिजे. तुम्हांस त्यांनी हांकून दिले तर एकांतवासांत देहविसर्जन करण्यास जा. गुरु गोवि दसिंगाचे अनुकरण तुम्ही करा. असाच मनुष्य हिंदु या संज्ञेला पात्र आहे. आपणा सर्वाच्या पुढे हे एकच ध्येय पाहिजे. भांडणांचें सारें मूळ विसरून जाऊन केवळ प्रेमाचे प्रवाह आपल्या अंत:करणांतून बाहेर पडले पाहिजेत.
 भरतभूमीच्या पुनरुज्जीवनाच्या गोष्टी अनेक लोक बोलतात. त्यांच्या इच्छे प्रमाणे त्यांना वाटेल तें बोलू द्या. पण तुम्ही धर्ममागीवर आरूढ होईपर्यंत हिंदु स्थानाचे पुनरुज्जीवन होणार नाही, हे मी तुम्हांस पुनःपुन्हा बजावून सांगतो. माझा सारा जन्म याच उद्योगांत मी घालविला. निदान तसा उद्योग करण्याचा यत्न तरी मी केला; आणि या खटपटीत असतां जो अनुभव मला आला; त्याच्याच अनुरोधाने हे माझे नत मी तुम्हांस सांगत आहे. केवळ हिंदुस्था नाचेच नव्हे तर सा-या जगाचे कल्याण तुम्ही धर्मज्ञ होण्यावर अवलंबून आहे. आता मी तुम्हांस अगदी उघडपणे सांगतो की, पाश्चात्य संस्कृति आतां अगदी खालच्या पायापासून हादरली आहे. तो पाया केव्हां उखडेल याचा भरंवसा नाही. वाळूच्या पायावर केवडीही भव्य इमारत तुम्ही उठविली तरी तिची गति अकस्मात् काय होईल, हे सांगण्यास कोणी भविष्यवादी पाहिजे काय ? पाश्चात्य संस्कृतीची सारी उभारणी शुद्ध जडवादाच्या पाया वर झाली आहे; आणि ती कितीहि भव्य आणि बळकट दिसत असली तरी एखादे दिवशी ती अवश्य धुळीला मिळेल. कोणत्या दिवशी तिचा पूर्ण निःपात होईल हे सांगता येत नाही. या गोष्टीची साक्ष सा-या जगाचा इतिहास देत आहे. राष्ट्रामागून राष्ट्र उदयास आले पण त्याची सारी भव्यता आणि त्याचे सौन्दर्य शुद्ध जडवादाच्या पायावर अवलंबून होते. मनुष्यप्राणी म्हणजे