पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

खंड.] हिंदु धर्मातील सामान्य सिद्धान्त. २६९


त्याचे अस्तित्व सिद्ध होत नसून त्याचे दर्शन पूर्वी प्रत्यक्ष घडलें आहे, आज प्रत्यक्ष घडत आहे, आणि भविष्यत्कालींहि हजारों लोकांस तें घडेल म्हणूनच तें खरे आहे. आत्मानुभव घेतलेले लोक पूर्वी होऊन गेले आणि पुढेहि हजारों होतील. असा आत्मानुभव घडल्याशिवाय मुक्ति हा शब्दहि उच्चारणे वायफळ आहे. याकरितां सा-या गोष्टींच्या आधी हा मुख्य महत्वाचा मुद्दा आपण ध्यानांत धरूं या. हा मुद्दा जो जो अधिक विस्तृत प्रमाणाने सामान्य जनांस पटत जाईल, तो तो पंथ आणि पोटपंथ आपोआप कमी होत जातील. ज्याने परमेश्वराचे दर्शन घेतले असेल तोच एकटा धर्मज्ञ ही गोष्ट सर्वांस कळेल. त्याचीच हृदयग्रंथि तुटून गेली असून, त्याचेच सर्व संशय छिन्न झाले आहेत हे निःसंशय समजावें. कर्मफलांतून फक्त त्याचीच मुक्ति होते. दूरांतदूर आणि जवळांत जवळ, अणूहून लहान आणि आकाशाहून मोठा अशा परमे श्वराचे दर्शन ज्याला घडले असेल तोच खरा मुक्त. नुसती बडबड म्हणजें धर्म असा भ्रम आपल्या बुद्धीला पुष्कळ वेळां होतो. मोठा बुद्धिवाद करून आपला पक्ष स्थापित करणान्या मनुष्याला आपण भ्रमाने धर्मज्ञ समजतों आणि यामुळेच धर्म ह्मणजे बडबड असें वाढू लागून अनेकपंथ निर्माण हो तात, आणि पुढे भांडणे उपस्थित होतात. आत्मानुभव हेच काय तें धर्मज्ञान, हे तत्त्व एकवार आपल्या बुद्धीला पटलें म्हणजे आपली प्रगति किती झाली आहे, याचा शोध आपल्याच अंतःकरणांत आपण करूं लागू, आणि त्याच वेळी सत्यवस्तूपासून आपण किती लांब आहों हेहि आपणांस कळेल; मग आपण स्वतःच अंधारांत चांचपडत आहों असे आपल्यास दिसून येईल. स्वतः अशा स्थितीत असतां लोकांस धर्म सांगण्याची इच्छा आपण करतों हे आ पलें मूर्खत्व आहे असे आपणांस कळून येईल. अशा स्थितीत पंथ आणि पंथांची भांडणे ही जीव धरूं शकणे शक्य नाही. मी अमुक पंथाचा ह्मणून मोठा धर्मज्ञ असें म्हणणार्या माणसास मी एकच प्रश्न विचारितों की, बाबारे, तूं प्रत्यक्ष परमेश्वराची भेट घेतली आहेस काय ? तुला आत्मानुभव झाला आहे काय? तसें नसेल तर त्याच्या नांवानें बडबड करण्याचा तुला अधिकार काय? तूं स्वतः अंधारांत चांचपडतोस आणि लोकांना त्याच अंधाराकडे नेऊ पाहातोस हे तुझें कृत्य शहाणपणाचे आहे काय? आंधळ्याने आंधळ्याला चालवावें आणि शेवटी दोघांनीहि खाडयांत पडावें तशांतलेंच

हे तुझें कृत्य.