पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

२२ स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ. [ नवम

असले पाहिजे. तो एकच परमात्मा या अनेक रूपांनी व्यक्त झाला आहे. ज्याप्रमाणे एकाच अग्नीच्या अनेक ज्वाळा असतात, अथवा एकच तेज अनेक प्रकारच्या रूपांनी प्रकट होते, त्याचप्रमाणे आत्मा अनेक आकारांनी प्रकट होतो.
 आतां येथे एक प्रश्न उपस्थित होण्याचा संभव आहे. तो प्रश्न असाः- जर आत्मा हा स्वयमेव परिपूर्ण आणि अत्यंत पवित्र असा आहे, तर अशुद्ध शरिरांत प्रवेश केल्यावर त्याचे काय होते ? एकाच वेळी एका चांगल्या, एका मध्यम आणि एका पापी देहांत तो प्रवेश करतो काय ? आणि अशा रीतीने दुष्ट देहांत तो गेल्यावर त्याचे पूर्णत्व कसे राहिले ? या प्रश्नाचे उत्तर श्रुतींनी असे दिले आहे:-'सूर्य हा प्रत्येक नेत्रांतील दृष्टीचे कारण असतांही डोळ्याच्या दोषानें तो लिप्त होत नाही.' एखाद्या मनुष्याला कावीळ झाली असली म्हणजे सर्व पदार्थ त्याला पिवळे दिसतात. त्याच्या दृष्टीचे कारणही सूर्यच आहे. म्हणून त्याच्या दृष्टीच्या या दोषाने सूर्य लिप्त होतो काय ? त्याच प्रमाणे हे एकरूप सर्वव्यापी म्हणजे सर्व वस्तूच्या ठिकाणी असतांही त्या वस्तूच्या दोषानें लिप्त होत नाही. त्या वस्तूंतील चांगले गुण आणि वाईट गुण या दोहोंतूनही तें मुक्त असते. यांपैकी कशाचाही संपर्क त्याला होऊ शकत नाही. या साऱ्या क्षणभंगुर विश्वांत असलेले चिरंतननित्यरूप जो पाहतो, या जड विश्वांतील चैतन्यरूपाची भेट जो घेतो, या अनेकविध रूपाच्या विश्वांतील एकरूपता ज्याच्या प्रत्ययाला येते आणि स्वतःचा जीवात्माही तोच आहे असा अनुभव ज्याला घडतो, त्यालाच परमानंदाची प्राप्ति होते - दुसऱ्या कोणालाही ती होत नाही. त्या ठिकाणी सूर्याचा प्रकाशही नाहीसा होतो, ताऱ्यांचें तेज लोपते आणि विद्युत् चमकत नाही; मग अग्नीची गोष्टच कशास बोलावी ? त्याचा प्रकाश आहे म्हणूनच या सर्वांस प्रकाश आहे. त्याजपासून उसन्या घेतलेल्या प्रकाशाच्या बळावर ही सारी स्वतःस प्रकाशमान म्हणवितात. त्याच्या प्रकाशामुळेच सारे विश्व प्रकाशरूप होऊन दृश्यत्वास आले आहे. अंतःकरणांत खळबळ उडविणाऱ्या साऱ्या इच्छा नाहीशा झाल्या म्हणजे मर्त्य असतो तोच अमर होऊन ब्रह्मरूप होतो. अंत:करणांतील साऱ्या गांठी आणि खांचीखोंची नाहीशा झाल्या म्हणजेच मर्त्य अमरपद पावतो. अमृतत्वाचा मार्ग अशा प्रकारे सांगितला आहे. हे कथा-