पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

खंड.] हिंदु धर्मातील सामान्य सिद्धान्त.२५९


एकजीव होऊन गेल्यामुळे अंतःसृष्टीची आवड ही आह्मांस उपजतबुद्धी सारखी होऊन बसली आहे. हिंदु ह्मणजे धर्मज्ञानप्रियतेची मूर्ति असा आमच्या कुलाच्या नावाचा अर्थ रूढ झाला आहे असें म्हाणण्यास प्रत्यवाय नाही. हे वळण सा-या राष्ट्रालाच लागले आहे आणि आता त्यांतून त्याला परावृत्त करणे शक्य नाही. तरवार आणि अग्निशिखा हाती घेऊन लक्षावधि रानटी लोक येथे आले. स्वतःबरोबर आपला रानटी धर्महि त्यांनी येथे आणिला; पण आमच्या हृदयाला या वस्तूंचा स्पर्श होऊ शकला नाही. आमच्या मस्त क्रांतील मणि अबाधित राहिला; आमच्या हृदयांतील रहस्य कोणालाहि बाहेर काढता आले नाही. हिंदुकुलाचा जीवन हेतु हाच, आणि या हेतूचे जोपर्यंत उच्चाटन झाले नाही, तोपर्यंत हिंदुकुल नष्ट करण्याचे सामर्थ्य या विश्वांत कोणाच्याहि अंगी नाही हे तुम्ही निश्चित समजा. त्याला नष्ट करील अशी एकहि शक्ति अद्यापि जन्मास आलेली नाही. जगांतील सारा छळ आणि सारी दुःखें यांच्या लाटांमागून लाटा आम्हांवरून गेल्या तरी आमच्या जीविताला यत्किं चिताहे धक्का लागावयाचा नाही. प्रचंड ज्वालांतून प्रल्हादाप्रमाणेच आम्ही सुखरूप बाहेर पडूं. पण हे होण्यास आमचा हेतु मात्र आम्ही कधीहि आमच्या दृष्टिआड होऊ देतां उपयोगी नाही. जगांतील साऱ्या अनर्थातून आम्हांस वांचविण्याचे सामर्थ्य फक्त त्याच्याच अंगी आहे ही गोष्ट आपण नित्य लक्षांत बाळगिली पाहिजे. धर्मज्ञानाची आवड ज्या हिंदूला नाही तो हिंदूच नव्हे असें मी समजतो.
 इतर देशांत राजकारण आधी आणि धर्म मग, प्रत्येकाला राजव्यवहार अगोदर समजला पाहिजे आणि मग धर्माचे थोडें बहुत ज्ञान असल्यास चालेल. आमची गोष्ट ह्याच्या अगदी उलट आहे. धर्म प्रथम आणि बाकीच्या गोष्टी त्यानंतर; हा आमचा क्रम अनादि काळापासून ठरून गेला आहे. धमीचें ज्ञान आधी होऊन मग वेळ उरल्यास इतर गोष्टी करण्याची परवानगी आम्हांस आहे. हा मुख्य मुद्दा आपण एकवार ध्यानात ठेवला म्हणजे आमच्या हिंदु वंशाची सारी कर्तृत्वशक्ति कोणत्या मुद्यावर एकवटतां येईल, हे आपल्या लक्षात येईल, प्राचीन काळीहि याच बाबीकरितां हिंदुकुल अनेक वार एक वटले होते आणि आजहि आमच्या राष्ट्रीय कल्याणाचा एकच मार्ग आहे. एकी भूत हिंदुस्थान म्हणजे तत्त्वज्ञानाचे समीकरण असा अर्थ होतो. धर्मासाठी