पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

खंड ]हिंदु धर्मातील सामान्य सिद्धान्त.२५७


हिंदूला सांगवत नव्हते. जगांत जितके देश इतिहासांत नमूद आहेत, त्यांत परकीयांच्या पायांखाली इतका एकसारखा तुडविला गेलेला देश एकहि नाही. या देशाने जितकी दुःखें आणि संकटें भोगली त्याचा शतांशहि दुसन्या कोणाच्या वाट्याला आलेला नाही. तथापि प्राचीनकाळी अस्तित्वात अस लेलें हिंदुकुल आजहि जशाचे तसेंच अस्तित्वात आहे. संकटांस तोंड दे ण्याची त्याची जितकी तयारी पूर्वी होती, तितकीच ती आजहि आहे; इत केंच नव्हे तर तें कुल या संकटांनी अधिक बलवान् होत आहे अशीहि चिन्हें आज दिसत आहेत. जग जिंकण्याकरितां पुनः बाहेर पडण्याच्या तयारीत आम्ही आहोत, हीच गोष्ट आमच्या जिवंतपणाची द्योतक आहे.
 आज आपले विचार केवळ हिंदुस्थानाच्या चार भिंतींच्या आंतच वावरत नाहीत, हे आज आपणांस उघड दिसत आहे. आपल्या कल्पनांनी या भिंतींचें उड्डाण केले आहे हे आपणांस ठाऊक आहे. आपली मातृभूमि सोडून या कल्पना जगातील साऱ्या देशांत वावरू लागल्या आहेत आणि त्यांचा प्रवेश त्या वाद्म. यांत होत आहे. आपली इच्छा असो वा नसो, आपल्या कल्पना आपणांस आतां चिकटून बसत नाहीत, हे निश्चित आहे. या कल्पना विदेशीय वाङ्मयांत शिरत आहेत; एवढेच नव्हे तर तेथे त्यांचे अधिराज्य स्थापन होईल अशीहि चिन्हें दिसत आहेत. असें कां व्हावें ? याचे कारण हेच की, जगाच्या उत्क्रां तीचें जें समीकृत कार्य चालू आहे, त्यांत भरतभूमीनेच मोठा वाटा उच लला आहे. मनुष्याच्या मनांत उत्पन्न होणाऱ्या विचारतरंगांतील सर्वांत श्रेष्ठ आणि सर्वांत उदात्त तरंगांची उत्पत्ति भरतभूमीत होते. भरतभूमीच्या तत्त्वज्ञानाने जें श्रेष्ठ स्थान पूर्वी मिळविलें, तें त्याजकडे आजहि चालू आहे. मनुष्य जातीची वाढ किती मागानी करितां येईल, याचा शोध आमच्या पूर्वजांनींहि अनेक प्रकारे केला होता. अर्वाचीन पाश्चात्य राष्ट्र ज्याप्रमाणे बाह्य सृष्टीत अनेक मार्ग आज धुंडाळीत आहेत, त्याचप्रमाणे आमचे प्राचीन पूर्वजहि बाह्य सृष्टीचा कोनाकोंपरा धुंडाळीत होते. बाह्य सृष्टीचीं रहस्ये त्यांनी पुष्कळ शोधून काढलीं, आणि त्यांची बुद्धि विशाल असल्यामुळे सांप्रतच्या जगाच्या स्वप्नांतहि न आलेले असे चमत्कार त्यांनी करून दाखविले; पण त्यांच्या बुद्धीचे वळणच निराळे पडले. यामुळे बाह्य जग लवकरच सोडून उच्चतर हेतूच्या सिद्धीकडे ती वळली. जें जाणलें असतां जाणावयाचे असें

स्वा० वि० ख०-९-१७.