पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२५६ स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.[ नवमः


 आपले सर्वांचे एकमत कोठे आहे याचा विचार करण्यापूर्वी आणखीहि एक मुद्दा आपण लक्षात ठेवला पाहिजे. ज्याप्रमाणे प्रत्येक व्यक्तीला काही विशिष्टत्व म्हणून असते, त्याचप्रमाणे तें प्रत्येक राष्ट्रालाहि असते. 'देह तितक्या प्रकृति' ही म्हण राष्ट्रालाहि लागू पडण्यासारखी आहे. ज्याप्रमाणे दोन व्यक्ती एकसारख्या असत नाहीत, त्याचप्रमाणे दोन राष्ट्रहि एकसारखी असावयाची नाहीत. सृष्टिक्रमांत प्रत्येक मनुष्याला आपापलें नियत कार्य करावयाचे असते; आणि त्या कार्यपूर्तीला अनुरूप अशी त्याची मनोघटना असते. आपल्या पूर्व कर्माला अनुसरून पुढील क्रिया तो करीत असतो. चालू जन्माचा आपला कार्य क्रम त्याने पूर्वीच ठरवून टाकलेला असतो; आणि त्याला अनुसरून त्याच्या साऱ्या क्रिया घडत असतात. हाच नियम राष्ट्रालाहि लागू आहे. सृष्टीच्या व्यवहारांत प्रत्येक राष्ट्रालाहि काही नियतकार्य करावयाचे असते. या हेतूच्या पूर्तीसाठीच तें राष्ट्र जगत असते. हा नियम लक्षात घेऊन आपल्या राष्ट्राचें कार्य काय आहे, याचा विचार प्रथम केला पाहिजे. हिंदु मानवकुल कोणत्या हेतूनें जन्मास आले आहे हे प्रथम शोधून नंतर आपला कार्यक्रम आपण निश्चित केला पाहिजे. जगांतील राष्ट्रांच्या मालिकेत आपले स्थान कोणतें हैं आपण प्रथम पाहिले पाहिजे. कांहीं सर्पांच्या डोक्यांत मणि असतात आणि ते नाहीसे होईपर्यंत त्या सर्वांना कशानेंहि मरण येत नाही, अशा कल्पित गोष्टी आपल्या लहानपणी आपण पुष्कळ ऐकल्या आहेत. त्याच प्रमाणे एखाद्या राक्षसाचा अथवा दैत्याचा मृत्यु एखाद्या ढोलीत राहणाऱ्या पोपटाच्या हृदयांत असतो, असल्या कथाहि आपण पुष्कळ ऐकल्या आहेत. अशाच प्रकारें राष्ट्राचाहि जीवनहेतु एखाद्या ध्येयाच्या मध्यबिंदूत एकवट लेला असतो. त्या राष्ट्राचे राष्ट्रीयत्व त्या ध्येयांत असते. हे ध्येय नष्ट होई पर्यंत त्या राष्ट्राला मृत्यूचे भय नाही. तें ध्येय शिल्लक आहे तोपर्यंत तें राष्ट्र अवनतावस्थेला पोचलेले असलें अथवा कितीहि मलूल झालेले दिसत असले, तरी तें मृत्युवश होणार नाही. हा सिद्धांत लक्षात घेतला म्हणजे इतिहासा तील एका अपूर्व चमत्काराचा उलगडा आपणांस होतो. आपल्या या प्रिय भूमीवर रानटी लोकांच्या स्वाऱ्यांच्या लाटांवर लाटा येऊन आदळल्या. अल्ला हो अकबर' या आरोळ्यांनी कित्येक शतकें आकाशहि फाटून जात होते आणि कोणता क्षण आपल्या आयुष्याच्या अखेरचा होईल, हे कोणाहि