पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२४० स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ. [ नवम


तून गेला असें तुम्ही समजा. तो खराखुरा अवनतीच्या मार्गाला लागला असून त्याचा उपयोग कोणासहि होण्यासारखा नाही. ही दोन्ही भयावह स्थलें आपण टाळली पाहिजेत. आपणांस आज शूरांची गरज आहे. ताज्या दमाने ज्याचे रक्त सळसळत आहे अशी माणसे आपणांस हवीत. लोहमय स्नायु आणि पोलादी ज्ञानतंतु असलेली माणसें आज आपणांस हवीत. हवें तेथें वांकणाऱ्या विळविळीत प्राण्यांची आपणांस गरज नाही. असल्या प्राण्यांचे आधी उच्चाटन होऊ द्या. धर्म हा मोठा गहन विषय आहे असे म्हणून धर्मज्ञान अंधारांत लपवू पाहणाऱ्या माणसांचीहि गरज आपणांस नाही. धर्ममार्गात कसलीहि लपवाछपवी नको. वेदांतांत असला लपंडाव तुम्हांस कोठे आढळतो काय ? श्रुति, संहिता, पुराणे यांत त्याचा मागमूस तुम्हांस कोठे लागला आहे काय ? आपल्या प्राचीन ऋषि वर्यांनी तत्त्वज्ञानाच्या शोधासाठी गुप्त मंडळ्या स्थापन केल्या होत्या हे माझ्या तरी ऐकिवात नाही. ते काही हातचलाखी करीत होते, असें कोठे नमूद केल्याचे तुम्हांस ठाऊक आहे काय ? आपलें ज्ञान जगासमोर मांडण्यासाठी ऐंद्रजाल त्यांना करावे लागले, असा इतिहास तुम्ही कोठे वाचला आहे काय ? धर्मज्ञान सात पडद्यांत लपवून ठेवू पहाणे आणि वेडगळ गोष्टींना चिकटून बसणे हे दुबळेपणाचे चिन्ह आहे. अवनतीच्या आणि मृत्यूच्या या आगामी निशाण्या होत. याकरितां त्यांपासून तुम्ही फार सावध रहा. बलवान् व स्वावलंबी होणे हा आपल्या पुढील मार्गातील पहिला मुक्काम आहे. स्वावलंबी होणे ही गोष्ट खरोखरच अत्यंत महत्वाची आहे. स्वावलंबित्वाचा उपयोग आपणास किती प्रकारे करून घेता येतो, याची पुरती कल्पनाही करवणार नाही. आपला जो काही स्वभाव सध्या बनला आहे, त्याला अनुसरून या दोन वस्तू आपणांस अप्राप्यसुद्धा वाटतील इतक्या त्या मोठया आहेत; पण वस्तुस्थिति अशी नाही. त्यांत कांहीं गौप्य नाही. प्रत्येकाला त्या साधून घेतां येण्यासारख्या आहेत. हिमालयाच्या हिमस्नात शिखरावर बसलेल्या गुप्त महा त्म्यांच्या स्वाधीन ही तत्त्वे कोणीहि केली नाहीत. कोणाहि गुप्तमंडळ्यांनी त्यांचा कुणगा करून ठेवलेला नाही. धर्मतत्त्वे ही गुप्त ठेवण्यासारखी वस्तु आहे, या शब्दांचा उच्चार या भूमीत पूर्वी केव्हांहि झालेला नव्हता. हिमाल याचा प्रवास मी स्वतः केलेला आहे. तुम्ही गृहस्थाश्रमी आणि हिमाचल