पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

खंड.] आपणांपुढील कार्य. २४१


फार दूर यामुळे तुम्ही तेथे गेला नसाल; पण मी बोलून चालून संन्यासी. गेली चवदा वर्षे मी एकसारखा भटकत आहे. सारा हिमालय पर्वत मी धुंडाळून पाहिला, पण गुप्त मंडळ्या कोठे असल्याचा सुगावा मला लागला नाही. याचे कारण हेच की, अशा मंडळ्या अस्तित्वातच नाहीत. याकरितां असल्या मृगजळाच्या मागे धावत सुटूं नका. असली खुळे डोक्यात घेण्या पेक्षा तुम्ही नितांत जडवादी बनला तरी तुमचे आणि सा-या हिंदुकुलाचें अधिक कल्याण होईल. तुम्हीं शुद्ध नास्तिक बनला तर किमान पक्षी तुम्ही स्वावलंबी आणि आत्मप्रत्ययी तरी व्हाल. प्रत्येक गोष्टींत दुसऱ्याच्या तोंडा कडे पाहण्याची तुमची दुष्ट खोड तरी नाहीशी होईल; पण असल्या खुळसट कल्पनांमागे वेड्यासारखें धावत सुटणे हे मात्र अवनतीचे आणि विनाशाचें निश्चित चिह्न आहे. या कल्पना उघड उघड इतक्या वेडगळ आहेत की, त्यांचा नुसता विचार करण्यांत काळाचा अपव्यय काही चांगले लोकसुद्धा कसा करितात याचे मला मोठे नवल वाटते. ज्या समाजांत असली माणसें निर्माण होतात त्याला धिक्कार असो. चांगल्या माणसांनी सुद्धा असली खुळे निर्माण करण्याच्या नादी लागावें आणि त्यांचा शास्त्रोक्त अर्थ लावण्याचाहि यत्न करावा हे माणुसकीला मोठे लांछन आहे. सा-या जगाच्या वाड्मयभांडारांत इतका सडका माल दुसऱ्या कोठेहि नसेल. तुम्हांस आतां कांहीं करावयाचे असेल तर प्रथम धैर्यवंत व्हा. असल्या वेडगळ कल्पनांना शास्त्राधार शोधू नका. आमच्यांत असल्या खुळसटपणाचा भरणा आधीच कांहीं थोडा नाही. मग त्यांत यांची भर कशाला? ज्या आहेत त्यांचेच उच्चाटन आधी झाले पाहिजे. आपल्या शरिरावर आधीच असलेले व्रण प्रथम बरे केले पाहिजेत. ते न करता त्यां हुन अधिक जाज्वल्य आणि प्राणघातक काळपुळ्या निर्माण करणे शहाणपणाचें होईल काय? काही झाले तरी आमचे पहिले व्रण बिचारे गरीब स्वभावाचे आहेत; ते प्राणघातक नाही इतकेंतरी खास. हे व्रण बरे झाले म्हणजे आमच्या धर्मतत्त्वांचा देह तप्तकांचनासारखा उज्ज्वल आणि सुशोभित होईल. या तत्त्वांचे शोधन करा आणि त्यांनाच चिकटून रहा.
 आपलाच धर्म सार्वलौकिक होण्याच्या योग्यतेचा आहे, असे प्रत्येक धर्माचे अनुयायी म्हणतांना तुम्ही ऐकतां; पण तुम्ही ही गोष्ट लक्ष्यांत ठेवा की, सारे जग कोणत्याहि एकाच धर्माचे अनुयायी बनेल, ही गोष्ट कधीच

स्वा०वि० ख०-९-१६.