पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२३० स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ. [ नवम


आपली इच्छा असेल, तर त्याची आज्ञा आपण पाळली पाहिजे; आणि ज्या कोणापाशी आपणांस कांही देता येण्यासारखे असेल ते आपण मिळविले पाहिजे. सृष्टीचा हा विस्तृत ग्रंथ आपणांपुढे उघडलेला आहे. याच्या प्रत्येक पानांतून ज्ञान संपादन करणे हे आपले कर्तव्य कर्म आहे. तथापि येथे आणखीहि एक मुद्दा अवश्य लक्ष्यांत ठेविला पाहिजे. जगाला शिकविता येण्यासारखें आपणापाशीहि काही आहे हे विसरता उपयोगी नाही. स्वतः बद्दल फाजील अभिमान बाळगणे हे जसें अनिष्ट, तसेंच अभिमानशून्यता असणे हेहि अनिष्टच आहे. बाह्य जगाशी संबंध तोडून टाकून आपलें चाला वयाचे नाही. बाह्य जगाशी आपणांस काही करावयाचें नाही, हा आपला जुना अभिमान मूर्खपणाचा होता, आणि या खोट्या अभिमानाला बळी पडल्या मुळेच आज हजार वर्षे गुलामगिरीची शिक्षा आपण भोगीत आहो. जगांत काय चालले आहे इकडे आपण लक्ष्य दिले नाही, आपण कोठे आहों आणि जग काय करीत आहे, याची तुलना आपल्या चित्ताशी आपण कधीच केली नाही. हिंदु मानसिक अवस्थेची जी दुर्दशा आज झालेली दिसत आहे, हे एक मोठे कारण आहे. असो; झालें तें होऊन गेले. आतां पुढला विचार तरी आपण नीट करूं या. परदेश गमन हे मोठे पातक आहे, असल्या प्रकारच्या बालिश कल्पना आपण टाकून दिल्या पाहिजेत. असल्या कल्पना पु-या नष्ट करून टाकाव्या. बाह्य देशी तुम्ही जों जो अधिक प्रवास कराल, तो तो तुम्हांस आणि तुमच्या देशासहि तो अधिक हितकर होईल. गेली शेकडो वर्षे या मार्गाचा स्वीकार तुम्हीं केला असता तर आजची स्थिति तुम्हांस कधीच प्राप्त झाली नसती, आणि हिंदुस्थान देश आजच्याप्रमाणे कोणाच्याही हातचे खेळणे होऊन राहिला नसता. जेथें जिवटपणा म्हणून आहे तेथे विस्तार पावण्याची पात्रताहि अवश्यमेव असतेच. किंबहुना, विस्तार पावणे आणि वाढत जाणे हेच जिवंतपणाचे दृश्य चिह्न आहे. याकरितां, तुम्हांस जगावयाचे असेल तर विस्तार पावण्यावांचून दुसरा मार्गच तुम्हांस नाही. ज्या क्षणी ही विस्तार पावण्याची क्रिया बंद पडेल, त्याच क्षणीं मृत्यु तुम्हां वर झडप घालील. : आपल्या डोळ्यांसमोर असलेले हे भयाचे स्थान नित्य ध्यानात ठेवूनच आपला पुढचा मार्ग आपण सुधारला पाहिजे. मी अमेरिकेचा आणि युरोपाचा प्रवास केला, याचाहि अर्थ हाच. भरतभू- .