पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

खंड.]हिंदुस्थानांतील तत्त्ववेत्ते.२२३


जानें ज्याला बहिष्कार घातला त्याला अद्यापिही येथे आश्रय मिळतो. केवळ तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने श्रीशंकराचार्याच्या मार्गाइतका उदार आणि व्यापक मार्ग दुसरा नाही. अनेक पंथांत आणि धर्मात वस्तुतः भेद नाही ही गोष्ट आचार्यांचे सारे अनुयायी कबूल करितात; तथापि हेच अनुयायी वर्ण भेद अत्यंत कठोरतेने पाळतात, हेही येथें अवश्य सांगितले पाहिजे. उलटपक्षी वैष्णवधर्म सर्वांना पोटाशी धरीत असतो; पण तत्त्वदृष्ट्या आपलाच मार्ग तेवढा खरा असा हटवादीपणाही करीत असतो.
 श्रीमच्छंकराचार्य यांची बुद्धि जशी विशाल होती, त्याचप्रमाणे श्रीचैत न्यांचें अंतःकरण विशाल होते. यानंतर या दोन वस्तूंचा संगम जेथें एकत्र असेल अशी विभूति उत्पन्न होण्याची वेळ आली. ज्याच्या ठिकाणी बुद्धीचें विशालत्व आणि अंतःकरणाची आर्दता यांचा एकत्र वास असेल, अशा अव ताराची आतां आवश्यकता उत्पन्न झाली होती. अनंत प्रकारच्या पंथांच्या द्वारे एकच परमेश्वर आपले कार्य करीत आहे, हे पाहण्याइतकी दिव्य दृष्टि ज्याला आहे, असा नवा अवतार आता हवा होता. वस्तुमात्राच्या ठिकाणी ज्याच्या दृष्टीला एकाच परमेश्वराचे स्वरूप दिसतें, दीन दुबळ्यांच्या आणि पतितांच्या दर्शनाने ज्याच्या अंतःकरणाला पाझर फुटतो; हा स्वकीय, हा परकीय, असा भेद ज्याच्या दृष्टीला दिसत नाही; आणि नाना पंथांतील रहस्ये ओळखून त्यांचे अंतर्गत ऐक्य जाणण्याइतकी ज्याची बुद्धि विशाल आहे; असा अवतार आता होणे इष्ट होते. सर्व मतमतांतरांचे ऐक्य करून सर्वव्यापी असा एकच धर्म निर्माण करण्याचे सामर्थ्य ज्याच्या बुद्धीला आहे, असा अवतार आता हवा होता; आणि अशी वेळ आल्याबरोबर असा पुरुष उत्पन्न झाला. या श्रेष्ठ विभूतीच्या पायांजवळ कित्येक वर्षे बसण्याचे महद्भाग्य मला प्राप्त झाले होते. ही वेळच अशी होती की, असा पुरुष उत्पन्न व्हावा. पाश्चात्य आचारविचारांनी अगदीं गजबजून गेलेल्या एका शहरासन्निध या पुण्य पुरुषाचा जन्म झाला; आणि याचे मुख्य अवतारकार्यही याच ठिकाणी झाले. हे शहर अगदी बेभान होऊन पाश्चात्य कल्पनांमागे पळत सुटलें होतें. पाश्चात्य वस्तूचे वेड त्याला लागले होते. हिंदुस्थानांत दुसरे कोणतेंहि गांव याच्या इतके युरोपीय बनले नव्हते. अशा प्रकारच्या शहरासंनिध हा अव तार जन्मास आला, आणि या शहरांतच त्याचे कार्य सुरू होते. पुस्तकी