पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२२२ स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ. [नवम


होय. रामानुजांच्या काळापासून धर्मोन्नतीचा मार्ग सर्वांस सर्रास मोकळा झाला, ही गोष्ट विशेष लक्ष्यांत ठेवण्यासारखी आहे. रामानुजांनंतर जितके धर्मगुरू झाले, तितक्या साऱ्यांनी हा मुद्दा लक्ष्यांत ठेवला होता. श्रीशंकरा चार्याच्या काळापूर्वीचेही धर्मगुरु या बाबींत मागे नव्हते. खुद्द शंकराचार्या नींहि खालच्या वर्गासाठी कांहींच केले नाही. अथवा त्यांच्या धर्मोन्नतीला विरोध केला असा आक्षेप त्यांजवर कां यावा हे मला समजत नाही. त्यांच्या साऱ्या ग्रंथभांडारांत अशा अर्थाचा एक शब्दही मला दिसत नाही. आता आचार्यांच्या कालानंतर त्यांची ग्रंथसंपत्ति एखाद्या विशिष्ट वर्गाच्या हातांत राहिली असेल तर तो त्यांचा अपराध नाही. भगवान् बुद्धाचीहि अशीच गोष्ट झाली. त्यांच्या तत्त्वांचे मूळरूप त्यांच्या शिष्यपरंपरेच्या हाती आल्या नंतर ते भ्रष्ट झाले. चैतन्य हे मुख्यतः भक्तिमार्गप्रवर्तक होते. गोपींची शुद्धभक्ति त्यांच्या ठिकाणी अवतीर्ण झाली होती. भक्तीचे वेड त्यांना लागले होते. त्यांचा जन्म अत्युच्च आणि शुद्ध बुद्धिमार्गी ब्राह्मणकुलांत झाला होता. न्यायशास्त्रांत ते स्वतः अत्यंत प्रवीण होते. प्रतिपक्षाबरोबर अनेक शब्द युद्धे करून त्यांत ते विजयी झाले होते. अशा सभा जिंकणे हीच ब्राह्मण पंडिताच्या जन्माची इतिकर्तव्यता आहे असा समज त्या काळी होता, आणि चैतन्यांनाहि याच समाजाचे बाळकडू लहानपणापासून मिळाले होते; पण कोणा गुरूच्या प्रसादानें ही परिस्थिति पालटली. चैतन्यांचें सारें अंतरंग बद लून गेले. त्यांनी या शाब्दिक युद्धांचा त्याग केला. आपलें सारें तर्कशास्त्र ते विसरून गेले. त्यांचे मन पूर्ण परावृत्त होऊन तें शुद्ध भक्तिमार्गाकडे वळले. साऱ्या जगांत श्रीचैतन्यदेवासारखा भक्त आजपर्यंत कोणी झाला नाही. त्यांच्या भक्तीचा प्रवाह सा-या बंगालभर वाहिला; आणि अनेक जीवांना शांतिसुखाचा लाभ त्यांनी करून दिला. त्यांच्या भक्तीला मोजमाप नव्हते. कोणी साधु असो अथवा अत्यंत पातकी असो; हिंदु असो अथवा मुसल मान असो; स्त्री असो अथवा पुरुष असो; मोठा राव असो अथवा रस्त्यांत फिरणारा रंक असो; चैतन्यांच्या हृदयांत सर्वांना एकच स्थान मिळे. आज चैतन्यपंथाची अवनति झाली आहे ही गोष्ट खरी, आणि कालांतराने सर्वच धर्मांना ग्लानी येत असते हेही खरें; तथापि आजच्या मितीसही दीनदुब ळ्यांचा पाठीराखा कोणता पंथ असेल तर तो चैतन्यपंथच होय. सर्व समा