पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

खंड.]हिंदुस्थानांतील तत्त्ववेत्ते.२१३


गोष्टी खऱ्या असतील; तथापि या सा-यांना काही तरी मूळ पाया असला पाहिजे. इतका एकच मुद्दा तुम्ही ध्यानांत धरा. एवढी मोठी प्रचंड इमारत पायावांचून उभी राहिली नाही हे निःसंशय सिद्ध आहे. याकरितां बारीकसारीक गोष्टींचा मेळ घालण्याच्या भानगडीत न पडता, मुख्य मुद्दा लक्षात घेऊन त्याचे रहस्य जाणावें हेच आपणांस उचित आहे.
 कोणत्याहि अवतारी पुरुषाचें चरित्र तुह्मीं पाहिले तर त्याचा अवतार हो ण्याच्या पूर्वी जो काही कल्पनासमूह अस्तित्वात होता, त्याचेच उत्क्रांत रूप त्या अवतारी पुरुषाच्या द्वारे व्यक्त झाले आहे, असे आपल्या निदर्श नास येईल. त्या त्या देशांत त्या त्या काळी जी धर्मतत्त्वे इतस्ततः वावरत होती, त्यांचे एकीकरण करून ती सुसंबद्ध रूपाने जनतेस शिकविण्याचे कार्य तो करीत असतो. दीर्घ काळानंतर असा एखादा पुरुष वास्तविक अस्तित्वांत तरी होता की नाही अशी शंका उत्पन्न होऊं लागणे हल्ली साहजिक आहे. पण तसे झालें तरी त्याने सांगितलेलें तत्त्वज्ञान नष्ट झालेले नसते. जगांत ते सदोदित जिवंत रूपाने वावरत असते. निष्काम कर्म, निष्काम प्रेम, आणि कृष्णाने सांगितलेले दुसरें तत्त्वज्ञान या वस्तू आज मेलेल्या आहेत काय ? त्यांचे सजीव अस्तित्व आपल्या डोळ्यांनी आज आपणांस दिसत नाही काय? मग ही तत्त्वे कोणातरी एका व्यक्तीपासून उद्भवली असली पाहिजेत असे आम्ही म्हटले तर त्यांत चूक काय आहे ? ही तत्त्वे आकाशांतून पडली आणि धर णीवर सांवरली असें तर झाले नाही हे खास. मग ती जेथून प्रथम निर्माण झाली असें एक मूलस्थान असले पाहिजे, असे म्हणणे चुकीचे आहे काय ? या तत्त्वांचा प्रचार भगवान् श्रीकृष्णांनी प्रथम केला, असे म्हणण्यांत आम्ही कांहीं चूक करीत नाही. भगवान् श्रीकृष्णांनी आरंभिलेले हे कार्य भगवान् श्रीव्यासांनी पुढे चालविलें. कृष्णचरित्रांतील सर्वश्रेष्ठ भाग गोपीचरित हाच होय; आणि कृष्णाला लावण्यात येणाऱ्या अनेक विशेषणांत 'गोपीजनवल्लभ' हे विशेषण सर्वश्रेष्ठ आहे. या भक्तिरसाच्या आवेशाने तुमच्या मेंदूत प्रवेश केला म्हणजे मंगलमय गोपीचे रहस्य तुम्हांस समजेल आणि त्याच वेळी खरी भक्ति म्हणजे काय याचाहि उलगडा होईल. या वेळी सारे जग तुम्हांस अदृश्य होईल, साऱ्या कल्पना, भावना आणि आकांक्षा चित्तांतून पार वित ळून जातील. तुमचें चित्त नितांत शुद्ध होईल आणि भक्तीशिवाय दुसरी