पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२०६ स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ. [ नवम


फोल आहे. आपण काय बोलतों हे तुमचें तुम्हांसच समजत नाही. परमे श्वराची भेट तुम्ही घेतली असेल, तर तुम्ही कोणाशीहि वादविवाद करणार नाही. तुमच्या ठिकाणी ज्ञानाचे प्रत्यक्ष वास्तव्य आहे ही गोष्ट तुमच्या मुखा वरचें तेजच बोलून दाखवील. उपनिषदांत यासंबंधी एक कथा आहे. एका ब्राह्मणाने आपल्या मुलाला ब्रह्मप्राप्तीसाठी गुरुगृही पाठविले. तेथून मुलगा परत आला, तेव्हां बापाने त्याला प्रश्न केला, 'मुला, तूं काय शिकलास ?' उत्तरादाखल मुलाने अनेक शास्त्रांची नांवें बापाला सांगितली. ती ऐकून घेऊन ब्राह्मण म्हणाला, 'तर मग अद्यापि तूं कांहींच शिकला नाहीस. याक रितां गुरुगृहीं तूं परत जा.' त्याप्रमाणे मुलगा परत गेला आणि काही काळ लोटल्यावर तो परत आला; तेव्हां ब्राह्मणानें तोच प्रश्न पुन्हां त्याला केला आणि मुलानेंहि पुन्हां तेंच उत्तर दिले. ब्राह्मण म्हणाला, 'तुझ्या या साऱ्या विद्या व्यर्थ आहेत, तूं पुन्हां परत जा.' बापाच्या आज्ञेप्रमाणे मुलगा पुन्हां गुरुगृही गेला. काही काळ लोटल्यानंतर तो परत बापाकडे आला. त्याला पाहतांच बाप म्हणाला, 'मुला, आज मात्र तुझें तोंड ब्रह्मज्ञाप्रमाणे तेजोमय दिसत आहे.' परमेश्वराशी तुमची प्रत्यक्ष भेट होईल त्या वेळी तुमचा सारा नूर बदलून जाईल, तुमचा आवाज वेगळा होईल, किंबहुना तुम्ही सारेच बद लून जाल. अशा स्थितीत तुमचे अस्तित्व मानवजातीला आशीर्वादरूप होईल. तुमच्यापुढे सारे जग नम्र होईल. ऋषित्वाला उल्लंघन करण्याचे सामर्थ्य या विश्वांत कोणालाहि नाही. या स्थितीला ऋषित्व असें म्हणतात, आणि आमच्या धर्माचे अखेरचें साध्य म्हणजे हे ऋषित्व अथवा ही ब्राह्मी स्थिति प्राप्त करून घेणे हेच आहे. याखेरीज बाकीच्या साऱ्या गोष्टी केवळ दुय्यम प्रतीच्या असून त्यांचे महत्व पूर्वतयारीहून अधिक नाही. तात्त्विक वाद विवाद, अनेक दर्शनें, द्वैत, अद्वैत आणि फार काय पण प्रत्यक्ष शृतीचा अभ्यासहि याच दुय्यम स्वरूपाचा आहे. ब्राह्मी स्थिति प्राप्त करून घेणे हा मूलहेतु असून बाकीच्या साऱ्या गोष्टी या मुख्य हेतूची पोषक उपकरणे मात्र होत. ज्या ज्ञानाने ही ब्राह्मी स्थिति प्राप्त होते, तें ज्ञान प्रमुख असून बाकीचें सारे शास्त्रज्ञान दुय्यम प्रतीचे आहे. असे ज्ञान प्राप्त करून घेऊन जे ब्राह्मी स्थितीला पावले, त्यांनाच शृतींत ऋषि अशी संज्ञा प्राप्त झाली; आणि अशा प्रकारची स्थिति प्राप्त करून घेणे, हे आम्हांपैकी प्रत्येक खऱ्या हिंदूचे अवश्य