पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

खंड ] हिंदुस्थानांतील तत्त्ववेत्ते. २०५


अखेरचे साध्य हेच आहे हे आपण नित्य लक्षात ठेवले पाहिजे. कोणत्याही धर्माचें साध्य हेच असले पाहिजे, ही गोष्ट जगांतील सर्व राष्ट्रांच्या गळी उतरली, तर जगांतील पुष्कळशी तंटेभांडणे नाहीशी होतील. धर्म ही वस्तु काही विशिष्ट ग्रंथांत सांठविलेली आहे असें नाहीं. शुष्क उपपत्तीत ती नाही; ती हठवादांत नाहीं, ती पांडित्यांत नाही, अथवा मोठ्या बुद्धिवादांतहि तिचे अस्तित्व नाही. जी वस्तु तुम्हांस सत्य अशी वाटते ती स्वतः होऊन जाणे यांत धर्म आहे. ऋषित्व अंगी आणून सत्यवस्तूची भेट जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष घ्याल, तेव्हांच तुम्ही धर्ममार्गी आहां असे म्हणता येईल. असे होई पर्यंत धार्मिक जीवनाचा प्रारंभहि तुम्ही केला नाही असे म्हटले पाहिजे. जाणिवेपलीकडे जाईपर्यंत तुमच्या धर्मविषयक कथांना वायफळ बडबडीहून अधिक किंमत नाहीं; फार झाले तर तुम्ही आगाऊ तयारी करीत आहां इतकेंच मानतां येईल. ज्या वस्तूविषयी तुम्ही बोलतां तिचे प्रत्यक्ष ज्ञान तुम्हांस नसून तुमचें तें ज्ञान उष्टें असतें. लोक बोलतात तें ऐकून तुम्हीहि बोलत असतां. एके प्रसंगी कांहीं ब्राह्मणांशी भगवान् बुद्धांचा मोठा वाद झाला. ब्रह्माचे स्वरूप काय हा वादाचा विषय होता. तेव्हां भगवान् बुद्धांनी ब्राह्मणांस प्रश्न केला, 'तुम्हीं ब्रह्म पाहिले आहे काय?' त्यावर 'नाही' असे उत्तर ब्राह्मणांनी दिले. तें ऐकून भगवान् बुद्धदेव म्हणाले 'बरें. तुमच्या वडिलांनी अथवा आजो बांनी तरी ब्रह्म पाहिले होते काय ?' 'नाही' असे उत्तर मिळतांच बुद्धदेव पुढे म्हणाले, 'माझ्या मित्रांनो जी वस्तु तुम्हीं अथवा तुमच्या वाडवडिलांनीहि डोळ्यांनी पाहिली नाही, तिजबद्दल वादविवाद कशाचा करितां ? असल्या वादविवादांत खऱ्याखोट्याचा निवाडा तरी कोणी करावा ?' साऱ्या जग भर आज हाच धुमाकूळ चालू आहे. 'हा आत्मा पुष्कळ भाषणाने प्राप्त होणार नाही, हा उच्चतमबुद्धीने मिळण्याजोगा नाहीं, अथवा शृतीच्या अभ्या सानेंहि हा मिळावयाचा नाही.' हे शृतिवाक्य आपण नित्य लक्षांत बाळगिलें पाहिजे. अनुभवाशिवाय आमचे सारे वादविवाद व्यर्थ आहेत. ज्या परमेश्व राबद्दल तुम्ही इतक्या निकराने बोलत असता त्याचे प्रत्यक्ष दर्शन तुम्ही घेतले आहे काय ? जगाला ईश्वरविषयक ज्ञान सांगण्याचा हक्क आपणांस प्राप्त झाला आहे असे तुम्हांस वाटते, पण जोपर्यंत परमेश्वराची प्रत्यक्ष भेट तुम्ही घेतली नाही, तोपर्यंत तुमचें सारें ज्ञान फुकट आहे, आणि तुमची बडबड