पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२०७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२०२ स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ. [ नवम


आहे असा भगवंताच्या म्हणण्याचा आशय आहे. येथे जगांतील कोणत्याही देशांत उत्पन्न झालेल्या विभूतीची पूजा करण्याची परवानगी भगवान् श्रीकृ ष्णनी आम्हां हिंदु लोकांस देऊन ठेविली आहे. कोणत्याही देशांत आणि कोणत्याहि काळी उत्पन्न झालेल्या सत्पुरुषाची पूजा करण्यास आमच्या धर्मानें मुभा ठेविली आहे. ख्रिस्ती लोकांच्या चर्चात आणि मुसलमानांच्या मशिदीत जाऊन पूजा करणारे हिंदु लोक आजही पुष्कळांच्या पाहाण्यांत आले अस तील; आणि असे असावें हे युक्तही आहे. असें कां असूं नये ? आमचा धर्म बोलून चालून जगद्व्यापी आहे, हे मी पूर्वी सांगितलेच आहे. त्याच्या पोटांत सर्वांना वाव आहे. तो कोणालाही बाहेर टाकीत नाही. तुमच्या ध्येयाचा दर्जा कोणताही असला तरी हिंदु धर्मात त्याला स्थळ मिळतें. कोणालाही पोटांत घेण्याइतकें औदार्य त्याच्या ठिकाणी आहे. धर्मविषयक म्हणून ज्या ज्या कल्पना सा-या जगांत आज अस्तित्वात आहेत, त्या साऱ्यांचा अंतर्भाव हिंदु धर्मात एका क्षणांत होण्यासारखा आहे; आणि पुढे ज्या कल्पना उदय पाव णार आहेत, त्यांचा अंतर्भाव आमच्या धर्मात होईपर्यंत स्वस्थ बसून वाट पाहण्याइतकी शांतीही आमच्या ठिकाणी आहे. वेदांत धर्माचे बाहू इतके विशाल आहेत, की त्यांच्या परिघांतून जगांतील कोणतीही धर्मविषयक क ल्पना बाहेर राहूं शकणार नाही.
 अवतारी पुरुष आणि ऋषिवर्य यांसंबंधी आमची कल्पना अशा प्रकारची आहे. ऋषि हा शब्द वेद ग्रंथांत वारंवार आढळण्यांत येतो; आणि सध्याच्या काळी तर तो अगदी सामान्य होऊन बसला आहे. ऋषि म्हणजे मोठे अधि कारी पुरुष. धर्माच्या आणि तत्त्वज्ञानाच्या बाबतीत त्यांचे बोलणे मोठ्या अधिकाराचे असते, हे आपण नीट लक्षात ठेवले पाहिजे. ऋषि या शब्दाची व्याख्या मंत्रद्रष्टा अशी केलेली आहे. मंत्रद्रष्टा म्हणजे सूक्ष्म विचारांस पाह णारा. अमुक तत्त्व खरें की खोटें हे ठरविण्याची अखेरची कसोटी काय, हा प्रश्न अत्यंत प्राचीन काळींहि वारंवार उद्भवत असे. इंद्रियांची साक्ष नेहमीच खरी असते असे नाही. इंद्रियें ही अखेरची कसोटी म्हणता येणार नाही. सत्यवस्तूपर्यंत इंद्रिये पोहोंचूं शकतच नाहीत. असें 'यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसा सह' या शृतीने निदर्शित केले आहे. त्याप्रमाणे 'न तत्र चक्षुर्गच्छति न वागच्छति नो मनः' या शृतींतही याच मुद्याचे स्पष्टीकरण