पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२०८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

खंड ] हिंदुस्थानांतील तत्त्ववेत्ते. २०३


आहे. हे स्पष्टीकरण फार पुरातन काळचे आहे. ही वचनें सांगितल्याला आज युगांची युगे होऊन गेली आहेत. बाह्य सृष्टींत आपण कितीही भटकलों तरी आत्म्याच्या अस्तित्वाबद्दल आपली निःसंशय खात्री होण्याचे साधन तेथे आपणांस सांपडणे शक्य नाही. त्याचप्रमाणे परमात्मरूपाचे अस्तित्व, आ त्म्याचे अमरत्व, मानवी जीविताचें अंतिम साध्य इत्यादि अनेक प्रश्नांचा समाधानकारक निकाल बाह्य सृष्टींत फिरून कधीहि लागावयाचा नाही. आपले मन प्रत्येक क्षणी बदलत आहे. कढत असलेल्या पाण्याप्रमाणे त्या लाहि एकसारखे कढ येत असतात. ते सान्त आहे. त्याला मर्यादा आहे. त्याला एकतानता नाही. छिन्नविच्छिन्न झालेल्या वस्तूप्रमाणे ते तुकडयातु कडयांचे बनले आहे. अशा स्थितींत अनंत, अभंग, अच्छेद्य आणि चिरजीवी अशा वस्तूविषयीं तें आपणांस काय सांगू शकणार ? ही गोष्ट त्याला स्वभा वतःच अशक्य आहे. या अनेक प्रश्नांची उत्तरें जडसृष्टीपासून मिळविण्या चा यत्न मनुष्याने जेव्हा जेव्हां केला, तेव्हां तेव्हां मोठे अनर्थकारक प्रसंग घडून आल्याची साक्ष इतिहास देत आहे. तर मग शृतींत उपलब्ध असलेल्या ज्ञानाची उत्पत्ति कोठून झाली? ती ऋषींपासून झाली आहे. ऋषि होणे हाच हे ज्ञान मिळविण्याचा मार्ग आहे. हे ज्ञान बाह्य इंद्रियांत नाही. जे इंद्रियगत नाही त्याची साक्ष इंद्रियें कशी देणार ? आणि आपण तरी जड इंद्रियांच्या साक्षीवर इतके अवलंबून का राहावें ? आपल्या अस्तित्वाचें सारांतलें सार इंद्रियांत सांठवलें आहे काय? 'आहे' असे म्हणण्याची छाती कोणासहि होणार नाही. आपला प्रत्यक्ष अनुभव तरी आपणास काय सांगतो? इंद्रिय जन्य सुखें कितीहि भोगली तरी आपल्या जीविताचें अंतिम साध्य तें नाहीं अशी खूणगांठ पटण्याचा एखादा तरी प्रसंग आपणांपकी प्रत्येकाच्या आयु ध्यांत एकदा तरी आलेला असता. आपणांस अत्यंत प्रिय असे एखादें माणूस मृत्युमुखीं जाते, त्याचे शव आपणांपुढे पडलेले असते; अशा प्रसंगी आपल्या चित्ताला मोठा धक्का बसतो. आपल्या साऱ्या चैनींची अखेर हीच काय, असा प्रश्न या वेळी आपल्या चित्तांत उभा रहातो आणि त्याला 'नाही' हेंच निश्च यात्मक उत्तर आपणांस मिळत असते. कित्येक वेळां आपलें चित्त विलक्षण शांति धारण करितें; आणि भक्तिभावाने ते भरून गेलेले असते. अशा प्रसंगी इंद्रियजन्य सुखांचा विचारहि आपणांस भयप्रद वाटतो. अशा प्रसंगी आपल्या