पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/१८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१८२ स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ. [ नवम


आहे, हे तुम्हांस आजसुद्धा दिसून येईल. पूर्वीची सारी मतें हळूहळू विराम पावू लागली आहेत. प्रत्येक वस्तु स्वभावतःच दुष्ट आहे असा समज प्राचीन- काळी होता. शिक्षणपद्धतींत, न्यायपद्धतींत आणि वैद्यकांतसुद्धा हेच मत पूर्वी प्रचलित होते. मनुष्याचे मन स्वभावतःच दुष्ट व अनीतीकडे धावणारें असून त्याला सुवृत्त करण्याकरितां शिक्षण द्यावयाचे असें पूर्वी मानीत. त्याच- प्रमाणे एखाद्या गुन्ह्याचा आरोप एखाद्यावर आला, तर आपला निरपराधी पणा त्याला शाबीत करावा लागे. तो अपराधी आहेच असे गृहीत धरून चालण्याची प्रवृत्ति पूर्वी होती. शरीर हे मूळचेच छप्पन रोगांचे माहेरघर असून औषधे देऊन सुदृढ करावयाचे असा वैद्यांचा समज होता. पण आतां हे सारे समज उलटे झाले आहेत हे आपण पाहत नाही काय? आतांचा कायदा म्हणतो की शरीर हे स्वभावतःच सुदृढ असून त्याला झालेले रोग त्याचें तेंच बरे करीत असते. औषधांचे काम फक्त या क्रियेला मदत कर ग्याचे आहे. हेच फौजदारी कायद्याचें आदितत्त्व आहे. प्रत्येक आरोपी सुवृत्त असून गुन्हा शाबीत होईपर्यंत त्याला गुन्हेगार मानूं नये असें अर्वा चीन कायदा सांगतो. तुरुंगांतील कैद्यांना वागविण्याच्या पद्धतीतही असाच बदल आता होऊ पहात आहे. मनुष्य कितीही अधोगतीला गेला असला, तरी त्याच्या ठिकाणीही ईश्वरांश आहे तो ओळखला पाहिजे, हे मत कैद्यांच्या बाबींतसुद्धा प्रचलित होत आहे. जुनी मते एकामागे एक कशी नाहीशी होत चालली आहेत हे यांवरून दिसेल. अत्यंत भयंकर गुन्हेगारांचीही नीतिमत्ता सुधारावी आणि त्यांनी चांगले व्हावे याकरिता त्यांना शिक्षण देणारे आश्र मसुद्धा स्थापन होऊ लागले आहेत. हा सारा बदल कशाने झाला? सर्वांच्या अंतर्यामी परमेश्वराचा वास आहे, या आमच्या आर्यमताचा हा विजय आहे. पाश्चात्य देश समजून अथवा न समजता या मताचे ग्रहण करीत आहेत. या बाबींत पाश्चात्यांनी आमचेच शिष्यत्व पत्करले पाहिजे. या साऱ्या वस्तूंच्या कार्यकारणभावाचा उलगडा आमच्या ग्रंथांत त्यांस सांपडेल. मनु- ध्यांतील परस्परांचे संबंध आजवर जसे चालत आले आहेत तसे यापुढे चालणार नाहीत. या संबंधांत आतां पूर्ण क्रांति व्हावयाची आहे. आतां साऱ्या जुन्या मतांनी राम म्हणण्याची वेळ आली आहे. चालू (एकोणिसाव्या) शतकाच्या अंताबरोबर या सान्या जुन्या खोडांचाही अंत होईल. आज