पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/१८६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

खंड] हिंदु चरित्रक्रमांतील वेदान्ताचे स्वरूप. १८१


म्हणणे आहे. माझ्यासमोर एक पडदा असून त्याला एक लहानसे छिद्र आहे असे समजा. अशा स्थितीत येथील मंडळीपैकी काहींची तोंडे मात्र मला दिसतील आणि बाकीची दिसणार नाहीत हे उघड आहे. आतां हेच छिद्र हळूहळू मोठे होत गेले तर अधिकाअधिक चेहरे मला दिसू लागतील आणि अशा रितीने सर्व पडदा नाहीसा झाला म्हणजे येथील सारे सभासद माझ्या दृष्टिपथांत येतील. अशा रीतीने माझ्या दृष्टीत आणि तुमच्यांत मध्ये कांहींच अडथळा राहिलेला नाही. पूर्वी मी तुम्हांस दिसत नव्हतों आणि तुम्हीही मला दिसत नव्हता; आणि आतां एकमेकांस आपण दिसू लागलो. यांत तुमच्यांत अथवा माझ्यांत काही बदल झाला काय ? तुमच्याआमच्यांत बदल झाल्यामुळे आपण एकमेकांस पाहू लागलों असें झाले आहे काय ? आरंभी तुमचे रूप जे होतें तेंच आतांही आहे. बदल झाला तो तुमच्यांत झाला नसून मधल्या पडद्यांत झाला. अद्वैतवाद्यांच्या मतांतील मुद्दा अशा प्रकारचा आहे. सृष्टीची उत्क्रांति होते आणि तीबरो बरच आत्मा व्यक्तरूपाला येऊ लागतो. आत्मा आकुंचित असतो आणि मग तो विस्तार पावत जातो हे म्हणणे अद्वैतवाद्यांना मान्य नाही. आत्म्याला आकुंचित करूं शकेल असा काही पदार्थच जगांत नाही. तो सर्वदा एकरूप आहे. त्याच्यांत कधीही बदल होत नाही. तो अनंत आहे. मग त्यांत बदल कसा आणि कशाने होणार ? त्याच्यावर सृष्टीचा पडदा आरंभी पडला होता. तो मायेच्या आवरणाखाली गुप्त झाला होता. हे मायेचे आवरण जो जों कमी होत जातें, तो तों आत्म्याचे स्वरूप व्यक्त होऊ लागते. आत्म्याचे मूळचे स्वाभाविक तेज कधी नष्ट झाले नव्हतें अथवा कमीही झाले नव्हतें. मायेचा पडदा त्याजवर आल्यामुळे ते अदृश्य मात्र झाले होते; आणि हा पडदा दूर होऊ लागतांच ते पुन्हां दिसू लागलें. जो जो हा पडदा अधिक विरळ होत जाईल, तों तों तें अधिकाधिक दृश्यमान होऊ लागेल. हेच मत आमच्या हिंदुस्थानापासून साऱ्या जगानें शिकले पाहिजे. आज आपल्या सुधारणेच्या केवढयाही मोठ्या गप्पा त्यांनी मारल्या आणि आज आपल्याच तोऱ्यांत ते कितीही गर्क होऊन राहिले असले, तरी अखेरीस हे मत आप लेसे केल्यावांचून जगांतील कोणत्याही मानवसमाजाचा निभाव लागावयाचा जाहीं असें कबूल करणे त्यांस भाग पडेल. जगांतील सारेंच चक्र फिरूं लागले