पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/१७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१७४स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.[ नवम


इतका स्वैर झाला आहे की, त्यांत सुसंबद्धता नसावी असाही भास होतो, आणि कल्पनांचा नुसता गोंधळ झाला आहे असे वाटू लागते. इंद्रियांपलीकडे तुम्हांस घेऊन जाण्याची धडपड येथे दिसेल. आपल्या बुद्धीच्या आटोक्या- बाहेर असलेल्या एखाद्या तत्त्वाकडे या ऋचा आपणास नेत आहेत असें तुम्हांस ताबडतोब कळून चुकतें. इंद्रियांनी ज्याचें ज्ञान करून घेता येत नाही, अशा एखाद्या वस्तूकडे आपण ओढले जात आहों, असा अनुभव तुम्हांस येतो. पण अशा स्थितीतही तुमची बुद्धी घाबरून जात नाहीं अथवा ती परतही फिरत नाही. कारण, बुद्धीच्या आटोक्याबाहेरचे असले तरी असें तत्त्व अस्तित्वांत खास आहे अशी जाणीव तुमच्या ठिकाणी त्यांनी अगोदरच उत्पन्न केलेली असते आणि हीच जाणीव या संधींत तुमच्या उपयोगी पडते.

  • न तत्र सूर्यो भाति न चन्द्रतारकं नेमा विद्युतो भान्ति कुतोऽयमग्निः।

"सूर्य, चंद्र, तारका, विद्युत् यांपैकी या स्थळाला कोणीही प्रकाशित करूं शकत नाही. मग या अग्नीबद्दल काय निराळे सांगावें?" अशा प्रकारच्या ऋचांशी तुल्य असे एखादें वाक्य तरी साऱ्या जगाच्या वाड्मयांतून तुम्हांस काढून दाखविता येईल काय ?
 'द्वा सुपर्णा सयुजा सखाया समानं वृक्षं परिषस्वजाते।
 तयोरन्यः पिप्पलं स्वाद्वत्त्यनश्नन्नन्यो अभिचाकशीति॥
 समाने वृक्षे पुरुषो निमग्नोऽनीशया शोचति मुह्यमानः ।
 जुष्टं यदा पश्यत्यन्यमीशमस्य महिमानमिति वीतशोकः ॥'
 "एकाच वृक्षावर सुंदर पिसान्याचे दोन पक्षी बसले होते. या दोघांत उत्तम स्नेह होता. यांपैकी एक त्या वृक्षाची फळे खात होता आणि दुसरा अगदी शांत बसला असून तो काही खात नव्हता. वृक्षाच्या खालच्या खांदी- वर बसलेला पक्षी कडू आणि गोड अशा दोन्ही प्रकारची फळे भक्षण करीत होता, आणि दुःख अथवा आनंद पावत होता. कडू फळ लागले म्हणजे शोक करावा आणि गोड मिळाले म्हणजे हर्षभराने नाचूं लागावें असा त्याचा क्रम चालू होता. तिकडे तो दुसरा पक्षी स्वात्मसुखनिमग्न होऊन स्वस्थ बसला होता. कडू किंवा गोड यांपैकी कोणतेंच फळ तो खात नव्हता. तो सुखाच्या मागे लागला नव्हता अथवा दुःखाने उद्विग्नही होत नव्हता. तो आपल्याच वैभवांत गर्क होऊन बसला होता." जगांतील साऱ्या तत्त्वज्ञा-