पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/१७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

खंड.] हिंदु चरित्रक्रमांतील वेदान्ताचे स्वरूप. १७३


विषयक ज्ञानाचा विचार आपण केला नाही, तरी केवळ भाषागांभीर्याने त्यांची बरोबरी करणारा एतद्विषयक ग्रंथ जगांत दुसरा नाही, अशी तुमची खात्री होईल. मनुष्याला मुक्तीचा मार्ग दाखविणारे जितकें कांहीं वाङ्मय साऱ्या जगांत आज उपलब्ध आहे, त्या साऱ्यांत उपनिषद्ग्रंग्रंथ मेरुमण्याच्या जागी आहेत. अत्यंत उदात्त अशा कल्पनांचें यथातथ्य रूप येथे जसें रंगविलें आहे, तसें दुसऱ्या कोठेही तें तुम्हांस आढळणार नाही. अंतर्ज्ञान हा एकटया मानवी मनाचाच हक्क आहे. बाह्यजग सोडून अंतःसृष्टीत बुडी मारण्याचे कार्य फक्त मानवी मनच करूं शकतें, आणि हे काम विशेषतः हिंदु मानवकुलानेच केलें असल्यामुळे त्याच्या अंतःसाक्षित्वाचे पूर्ण रूप येथें तुम्हांस पाहावयास सांप- डते. उदात्त भावनांची शब्दचित्रे जगांतील साऱ्या राष्ट्रांत रेखाटलेली आढ- ळतात; पण त्यांतील उदात्तपणा केवळ जड सृष्टीच्या हद्दीतलाच आहे. दृश्य विश्व ओलांडून पलीकडे उडी मारण्याचा यत्न त्यांनी केलेला नाही. या निय- माला अपवाद असा बहुधा एकही तुम्हांस आढळावयाचा नाही. मिल्टन, होमर, डान्टी अथवा यांजसारखेच दुसरेही जगविख्यात कवी घेतले, तरी त्यांच्या काव्यांतही हाच प्रकार आढळून येतो. त्यांत उदात्त प्रसंग पुष्कळ आहेत आणि त्या त्या कवींनी ते मोठ्या बहारीचे रंगविले आहेत हेही खरें; पण तेथेसुद्धां इंद्रियांस चिकटण्यापलीकडे मजल गेलेली नाही. अनंताला वीतभर जागेत कोंडण्याचा हा यत्न आहे. अशाच प्रकारचा यत्न श्रुतींच्या संहितांत आढळतो. सृष्टीच्या उत्पत्तीचे कथन ज्या ऋचांत केले आहे त्या किती सुंदर आणि उदात्त आहेत ! तथापि तेथें सृष्टीच्या बाहेर पाऊल पड- लेले नाही. अशा रीतीने अनंताचा माग लागावयाचा नाही ही गोष्ट आमच्या मंत्रद्रष्टयांच्या लक्ष्यांत लवकरच आली. बाह्यसृष्टीत आपण कितीही भट- कलों आणि आपला कल्पनासंचार कितीही स्वैर झाला, तरी त्याच्या आटो- क्यांत अनंत सांपडावयाचे नाही हे त्यांस कळून आले, आणि हा मार्ग: अशा रीतीने बंद झाल्यानंतर आपल्या चित्तांतील कल्पनासमूहास बाहेर पडण्यास दुसरा कोठे वाव आहे की नाही हे ते पाहूं लागले. यानंतर उप- निषदें निर्माण होत गेली. येथे पूचिी सारी भाषा बदलली, आणि तिला अगदी नवें वळण लागलें. 'नेति नेति' अशा प्रकारची नकारात्मक अथवा निषेध- बोधक भाषा येथे दृग्गोचर होऊ लागली. कित्येक ठिकाणी कल्पनांचा संचार