पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/१६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

खंड.] भक्ति. १५९


गळा कापण्याची तयारी करीत असतो. तो दिवा दोघांच्याही कर्मास सारखाच साक्षीभूत असतो; तथापि साक्षीभूत होऊनहि कोणाच्याच पुण्यपापांचा अधिकारी तो होत नाही. पुण्यपापांच्या सुखदुःखाची फळे प्रत्येक कर्म करणारा ज्याचा तोच भोगीत असतो. या पुण्यपापांबद्दल त्या दिव्याची स्तुति अथवा निंदा करणे चुकीचे होईल. त्याचप्रमाणे प्रत्येकाच्या ठिकाणी जें प्रेम वास करीत आहे ते स्वतः अगदी अलिप्त असते. तथापि त्याच्याच प्रकाशाच्या साक्षीने आणि त्याच्याच प्रेरक शक्तीच्या बळावर विश्व चालत आहे. कर्मप्रवणतेची प्रेरक शक्ति साऱ्या विश्वांत हीच एक आहे. ही शक्ति अस्तित्वांतून गेली तर विश्वाचीही ताबडतोब विघटना होऊन ते नष्ट होईल. या शक्तीच्या अभावी नष्ट होण्यास विश्वास एक क्षणही लागावयाचा नाही. आणि याच प्रेमस्वरूपाला ईश्वर हे नांव आहे. अनिर्वचनीय प्रेम हेंच ईश्वराचें स्वरूप असें नारदांनी म्हटले आहे.
 "पतीवर पतीसाठी प्रेम कोणीही करीत नाही. ते प्रेम आत्म्यासाठीच असतें. पत्नीवरील पतीचे प्रेम पत्नीसाठी नसून तिच्या ठिकाणी जें आत्म- रूप असते त्यावर तो प्रेम करतो. कोणाचे कोणत्याही वस्तूवरील प्रेम त्या वस्तूसाठी नसून तिच्यामधील आत्मस्वरूपासाठी असतें." ज्या स्वार्थ- साधूपणाचा इतका तिरस्कार आपण सारे करीत असतो तो स्वार्थही त्याच प्रेमाचे एक रूप होय. विश्वाच्या रंगभूमीवर हे एक मोठे नाटक चालू असून तुम्ही त्याचे प्रेक्षक आहां. पण तुम्ही खरे प्रेक्षक बना. केवळ बाजूस उभे राहून या नाटकाकडे तुम्ही पाहिले म्हणजे त्यांतील खरे रहस्य तुमच्या लक्षात येईल, यांत स्वतः न मिसळतां तुम्ही या देखाव्याच्या पंक्तीकडे पाहिले तर अनेक देखावे एकामागून एक कसे शांतपणे जातात हे तुम्हांस दिसेल. या नाटकांत स्वतः कोणतीही भूमिका न पत्करितां केवळ प्रेक्षक या नात्याने त्याजकडे तुम्ही अवलोकन केले, तर त्यांतील वेगवेगळे प्रवेश आणि अंक परस्परांचे पोषण करून अखेरीस एकतानता कशी उत्पन्न करतात हे तुम्हांस पाहावयास सांपडेल. यांत दिसणान्या अनेक देखाव्यांच्या पोटी अखेरीस प्रेम हे एकच तत्व आहे ही गोष्ट त्या वेळी तुमच्या लक्षांत पक्की येईल. अत्यंत स्वार्थांतही त्याचाच वास असतो आणि कालेकरून तेंच अधिक विस्तृत होत जाते. पुरुषाचे लग्न झालेले नसते तेव्हां केवळ स्वतःपुरताच