पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/१६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१५८ स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ. [नवम


परमाणूचा संयोग दुसऱ्याशी होतो तो कशामुळे ? परमाणू एकत्र होऊन अणू बनतात, आणि हे अणू पुनः परस्परांशी संयोग पावतात. ही संयोगाची क्रिया कोण घडवून आणतें ? आकाशांतील ग्रहादि गोलक एकमेकांकडे ओढले जात असतात ते कां ? दोन माणसे एकमेकांकडे कशामुळे ओढली जातात ? स्त्री आणि पुरुष या उभयतांस कोणता दुवा जोडीत असतो ? फार काय, पण मुकी जनावरेही एकमेकांकडे ओढली जातात. अशा रीतीने या आकर्षणाचा प्रत्यय साऱ्या विश्वभर येतो. सारें विश्व, जणू काय, एका केंद्राकडे आक- र्षिले जात असावे असे वाटते. या आकर्षक शक्तीलाच प्रेम असें नांव आहे; आणि अत्यंत सूक्ष्म परमाणूपासून तो थेट अत्युच्च प्राण्यापर्यंत तिचे स्वरूप व्यक्त होत आहे. प्रेम हे सर्वशक्तिमान् आणि सर्वव्यापी आहे. अचेतन अथवा सचेतन सृष्टीत आकर्षणाचा प्रत्यय जेथे जेथे येतो, तेथें परमेश्वराच्या प्रेमाचे अस्तित्वच त्या रूपाने प्रत्ययास येत असते. हे आकर्षण व्यक्तिगत असो अगर विश्वगत असो; त्याचे मूलरूप एकच. सर्व विश्वाला भ्रमण कर- ण्यास लावणारी शक्ति हीच. याच शक्तीला वश होऊन येशू ख्रिस्तानें मनुष्य- जातीसाठी आपला प्राण अर्पण केला. याच प्रेमामुळे एका यःकश्चित् प्राण्या- साठी भगवान् बुद्धाने आपला जीव धोक्यात घातला. याच प्रेमहेतूसाठी पत्नी पतीसाठी देहत्याग करते आणि पितरें मुलांसाठी जीव देतात. आपल्या मातृभूमीच्या रक्षणासाठी लक्षावधि शिपायी रणयज्ञांत आपली आहुती दे- तात तीच याच प्रेमासाठी होय; आणि अत्यंत आश्चर्याची गोष्ट ही की याच प्रेमाने वेडा होऊन चोर चोरी करतो आणि खुनी खूनही करतो. हे ऐकून आपले चित्त बावरें होऊ देऊ नका. येथे प्रेम व्यक्त दशेस येण्याची पद्धति वेगळी आहे इतकेंच; पण मुळांत प्रेरकशक्ती प्रेमच. चोराचे अतिरिक्त प्रेम सोन्यावर असतें. कोठेही सोने मिळण्याचा लाग आला की तेथें तो निःशंक- पणे उडी घालतो. सोन्याच्या ठायी असलेले प्रेम हीच त्याची कर्मप्रेरक शक्ति होय. आता तिच्या कार्याची दिशा चुकीची आहे ही गोष्ट वेगळी, पण मूळ हेतु प्रेम हाच. अशा रीतीने सर्व सत्कर्मांच्या अथवा दुष्कर्माच्या मुळाशी प्रेरक हेतु एकच असतो, हा मुद्दा आपल्या लक्ष्यांत आलाच असेल. एकाच दिव्याच्या उजेडांत बसून एखादा दाता गरिबांच्या मदतीसाठी हजार रुपयांची हुंडी लिहितो आणि दुसरा मनुष्य बनावट कागदपत्र करून कोणाचा