पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/१५५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१५०
स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

[नवम


काय ? जर तसे असेल तर त्याची प्राप्ति तुम्हांस अवश्य होईल. अशी तहान जोपर्यंत तुम्हांस लागलेली नाही, तोपर्यंत धर्माची पाऊलवाटही तुम्हांस दि- सावयाची नाही. तुम्ही वाटतील तितके बुद्धिवाद करा, उंटाच्या ओझ्याचे ग्रंथ वाचा, अथवा शेंकडों यज्ञयागादि कर्मे करा' जोपर्यंत यज्ञपुरुषाच्या भेटीची तळमळ तुम्हांस लागली नाही तोपर्यंत या साऱ्या गोष्टी फुकट आहेत. अशी तहान तुम्हांस लागली नाही तोवर धर्माच्या बाजारांत नास्तिक आणि तुम्ही यांची किंमत एकच. तुम्हां दोघांत फरक म्हटला तर इतकाच की उघड नास्तिक तुमच्याहून अधिक प्रामाणिक असतो.
 "एखाद्या खोलीत एखादा चोर शिरून बसला असला आणि शेजारच्या खोलीत द्रव्याचा मोठा हांडा भरला आहे, असे त्यास समजले, तर त्या चोराच्या मनाची स्थिति काय होईल ? त्याची झोप उडून जाईल. त्याला तहानभूकही समजेनाशी होईल. त्या ठेव्याशिवाय दुसरा कोणताही विचार त्याच्या मनास शिवणारसुद्धां नाही. तो ठेवा प्राप्त करून घ्यावा हे एकच चिंतन त्याचे चित्त करीत राहील. त्याचप्रमाणे अनंतसुखाचा, अनंत कल्या- णमय सागर आपणासंनिध आहे, किंबहुना आपल्या हृदयांतच आहे असे या लोकांस मनःपूर्वक वाटते, तर तो सागर हस्तगत करण्याचा यत्नही न करतां ते संसाराच्या डबक्यांत डुबकत राहिले असते काय, असा प्रश्न एका साधु- वराने केला आहे. परमेश्वराचे अस्तित्व खरोखरच आहे ही गोष्ट ज्याच्या चित्ताला पटली, तो त्याच्या प्राप्तीसाठी वेडा झाल्याशिवाय राहावयाचा नाही. जग कांहीही म्हणो, कोणत्याही मार्गानें तें खुशाल जावो, त्याची पर्वा तो करावयाचा नाही. ऐहिक जीविताहून अनंतपटीने उच्च असें दुसरें जीवित प्राप्त होण्याजोगे आहे, असें ज्याला कळलें तो या क्षणभंगुर जीविताला का चिकटेल ? इंद्रियातीत स्थिति प्राप्त होण्याजोगी आहे हे ज्याला समजलें, तो इंद्रियांच्या मर्यादित कक्षेत माशा मारीत का बसेल? चिरंतन जीवित मिळण्या- जोगे असतां अस्थिराला कोण हवेंसें म्हणेल? अमृत मिळण्याची खात्री असतां कांजीला लाळ कोण घोटील ? परमेश्वराच्या भेटीसाठी असा मनुष्य खरो- खर वेडा होईल. याच्या वेडेपणाला धर्मबुद्धिजागृति म्हणतात. या वेडेप- णाला जेव्हां सुरुवात होते तेव्हांच धर्ममार्गावर मनुष्य आरूढ होतो. असें होण्यास दीर्घकाळ लागत असतो. ही स्थिति प्राप्त करून घेण्याची आगाऊ