पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/१५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

खंड.]

भक्ति

.

१४९

परमेश्वराच्या प्राप्तीच्या इच्छेवांचून बाकीच्या साऱ्या इच्छा आपल्या मनांत जाज्वल्य आहेत. घरादारांची इच्छा आहे, बायकापोरांची इच्छा आहे. पर- मेश्वराची भेट व्हावी ही मात्र इच्छा आपल्या ठिकाणी नाही. हा धर्म नव्हे. आपल्या भोंवतीं जे मोठे धार्मिक म्हणून आपण पाहतो ते बहुतेक सारे दांभिक लोक आहेत. आमच्या रावसाहेबांच्या दिवाणखान्यांत अनंत प्रका- रचे सामान भरले आहे. अगदी नव्या फ्याशनला शोभेल अशा जिनसा त्यांनी द्वीपांतराहून मागविल्या आहेत, इतक्यांत आणखी एखादी फ्याशन उत्पन्न होते आणि ती पुरी करण्याकरितां एखादी जिन्नस ते जपानाहून माग- वितात. अगदी ताज्या फ्याशनप्रमाणे वागणे हाच बहुधा सध्या साऱ्यांचा धर्म होऊन बसला आहे. फ्याशनदेवीची आराधना सध्या बहुतेक सारे करीत आहेत. आधीं चैन आणि मग उरल्या वेळात थोडें बहुत धर्माचें सोंग, ही सध्याची स्थिति आहे आणि हे धर्माचे सोंग तरी कां? तर तसें न केल्यास लोक नांवें ठेवतील म्हणून. यामुळे केवळ लोकेषणेसाठी हे लोक धार्मिकपणाचे सोंग आणतात. ही स्थिति अमुक एका विशिष्ट देशांत आहे असे नसून ती साऱ्या जगभर आहे.
 एके वेळी एक शिष्य आपल्या गुरूकडे जाऊन म्हणाला, “महाराज, मला धर्मज्ञान पाहिजे.” त्या शिष्याकडे पाहून गुरु नुसते हंसले; पण त्यांनी भाषण कांहींच केले नाही. तो तरुण प्रत्येक दिवशी गुरूकडे येई आणि धर्मज्ञान सांगण्याविषयी त्यांची विनंति करी. एके दिवशी शिष्य आला असतां गुरूनें त्याला नदीवर नेले आणि पाण्यात बुडी मारण्यास सांगितले. गुरूच्या आज्ञे- प्रमाणे शिष्याने बुडी मारतांच गुरुमहाराजांनीही त्याच्या मागोमाग बुडी मारून त्याला घट्ट आवळून धरले. वर येण्यासाठी शिष्य धडपड करू लागला. अखे- रीस थोड्या वेळाने गुरूने त्याला सोडलें. गुरूची मिठी सुटताक्षणीच शिष्य वर आला, आणि त्याच्या पाठोपाठच गुरुमहाराजही वर आले. नंतर गुरु शिष्याला म्हणतात, “मुला, तूं नदीच्या तळीं होतास तेव्हां तुला काय हवेंसें वाटत होतें ? तुझ्या हृदयांत आत्यंतिक अपेक्षा कशाची होती?" तरुणाने उत्तर दिलें “महाराज, अल्पशा हवेची आकांक्षा माझ्या मनांत होती. एक श्वासोच्छ्वास टाकण्यापुरती हवा मिळेल तर माझें सर्वस्व मी देईन असे त्यावेळी मला वाटत होतें.” परमेश्वरप्राप्तीची अशी तळमळ तुम्हांस लागली आहे