पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/१५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

खंड.] भक्ति .१५१


तयारी म्हटली म्हणजे वाचन, मनन, पूजा, विधिविधाने, यात्रा इत्यादि होत. त्या गोष्टी चित्तशुद्धीसाठी आवश्यक आहेत. चित्तशुद्धीने जीवात्मा शुद्ध होतो, आणि मग पावित्र्याच्या सागराकडे जावे अशी इच्छा त्याला होते. मातीने अगदी मढून गेलेला एखादा लोखंडाचा तुकडा शेकडो वर्षे लोहचुंब- काजवळ पडला असला तरी त्याकडे तो आकर्षिला जात नाही; पण त्याव- रील धूळ नाहीशी होतांच चुंबक त्याला आपणाकडे ओढतो. त्याचप्रमाणे अनंतजन्मांच्या दुष्टत्वाची पुटें जीवात्म्यावर चढली असल्यामुळे परमात्म्या- कडे तो ओढ घेत नाही. पूजाअर्चा, भजन, वाचन, मनन इत्यादि कर्मांनी ही पुढे ढांसळून पडली म्हणजे जीवात्मा आणि परमात्मा यांजमधील स्वाभा- विक प्रेम व्यक्त होऊन ते एकमेकांसन्निध येतात. परोपकार, परसेवा, भूतमा त्राच्या ठिकाणी प्रेम ही जीवात्मा शुद्ध करण्याची साधने आहेत.
 तथापि ही सारी नुसती साधने आहेत हेही अवश्य लक्ष्यात ठेवले पाहिजे. या साऱ्या क्रिया आरंभींच्या स्थितीला मात्र उपयुक्त आहेत. ही खरी भक्ति नव्हे. भक्तीबद्दल सर्वत्र अनेक प्रकारची चर्चा आपणास ऐकू येते. देवाची भक्ति करा, हा उपदेश नवीन आहे असे नाही. पण खरी भक्ति म्हणजे काय आणि प्रेम कशाला म्हणावें हे कोणासच ठाऊक नाही. प्रेमाची खरी व्याख्या मनुष्यांस ठाऊक असती, तर त्याबद्दल इतकी भाराभर बडबड त्यांनी कधीच केली नसती. आपण मोठे प्रेमळ आहों असे प्रत्येकाला वाटत असते; पण थोडा काळ लोटतो न लोटतो तोच स्वतःचे हृदय अगदी कोरडे ठणठणीत असल्याचा अनुभव त्याला येतो. प्रेम त्याच्या प्रकृतींतच नसते. शाब्दिक प्रेम साऱ्या जगभर भरून राहिले आहे; पण खऱ्या प्रेमाचा अंशही कोठे प्रत्य- यास येत नाही. प्रेम म्हणजे काय ? प्रेमाच्या अस्तित्वाचे चिन्ह काय ? निर्व्याजत्व हे खऱ्या प्रेमाचे पहिले लक्षण आहे. प्रेमाच्या बदल्यांत आप- णास अमुक मिळावे अशी अपेक्षा खन्या प्रेमी मनुष्याला असत नाही. दुस- च्याकडून काही प्राप्ति व्हावी या हेतूने जेव्हा एखादा मनुष्य दुसऱ्यावर प्रेम करतांना दिसतो तेव्हां ते त्याचे प्रेम खरें नव्हे हे उघड आहे. तो वाणस- वदा झाला. अशी देवाण घेवाण जेथें आली तेथे प्रेमाचे अस्तित्व मुळीच नाहीं हें निःसंशय खरे आहे. त्याचप्रमाणे मनुष्य जेव्हां " देवा, मला अमुक दे, माझें बरें कर" अशी प्रार्थना करतो तेव्हां ती प्रार्थना प्रेमपूर्वक