पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/१२६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

खंड}

अभ्यास.

१२१


धर्मोपाध्यांची शास्त्रे तावून सुलाखून घेतली पाहिजेत, त्याचप्रमाणे अर्वाचीन शास्त्रोपाध्यांची वचनेंही तोलून घेण्यास आपण शिकले पाहिजे. एखादा अर्वाचीन पंडित केवढाही मोठा असला तरी तो सांगेल तें एकदम खरें मानूं नये. आरंभी आपली वृत्ति साशंक ठेवणे आपल्या हिताचे आहे. त्याचें म्हणणे ऐकून घ्यावे, त्यांतील साऱ्या मुद्यांचे पृथक्करण करावे; अनुभव पाहावा आणि अशा रीतीने तावून सुलाखून नंतर त्याचे ग्रहण करावें. अर्वाचीन शास्त्रांनी सांगितलेले काही सिद्धांत सर्वत्र प्रचलित झाले आहेत, परंतु त्यांची निःसंशय सिद्धि अद्यापि झालेली नाही. गणितशास्त्र हे मोठे निश्चित शास्त्र; तथापि त्याच्या कित्येक उपपत्ती नुसत्या गृहीत धराव्या लागतात. कारण त्या गृहीत धरल्या नाहीत तर पुढे पाऊलच पडावयाचे नाही. ज्ञानाची वाढ होईल तशा या उपपत्ती आपोआपच मागे पडत जातील.
 खिस्ती शकाच्या पूर्वी सुमारे १४०० वर्षांवर एक महान् तत्त्वदर्शी होऊन गेला. सूक्ष्मेंद्रियांच्या ज्या क्रिया अनुभवास येतात त्यांचे निरीक्षण व पृथ- करण करून त्यांना सूत्रबद्ध करण्याची खटपट त्याने केली. त्यानंतर त्याच्या कित्येक अनुयायांनी या शास्त्राच्या वेगवेगळ्या भागांचा विशेष अभ्यास करून या शास्त्राची वाढ केली.या शास्त्राचा अभ्यास अत्यंत मनःपूर्वक जर कोणी केला असेल तर तो हिंदूंनीच होय. दुसऱ्या कोणत्याही मानवकुलाने त्याकडे विशेष लक्ष्य दिले नाही. आज या विषयाची चर्चा आपणांसमोर मी करीत आहे, पण हे सारे विवेचन ऐकून घेऊन त्याप्रमाणे प्रत्यक्ष अभ्यास तुम्हांपैकी किती लोक करतील हे मला सांगता येत नाही; आणि काही जणांनी तसा आरंभ केला तरी त्या मार्गात किती दिवस ते टिकून राहतील हाही एक प्रश्नच आहे. या बाबतींत तुम्ही पाश्चात्य लोक अद्यापि अनभ्यस्त आहां; या बाबींत हिंदु लोक फार पक्के. पिढयांमागे पिढया या रीतीने युगानुयुगे त्यांचा अभ्यास चालू आहे. विशिष्ट देवळांत ठरीव वेळी जावें आणि ठरीव कवाईत करून ठरीव स्तोत्रे म्हणावी अशी पद्धत हिंदु लोकांत नाही हे तुम्हांस ठाऊक असे- लच. तथापि प्राणायाम करून मनाची एकाग्रता करण्याचा अभ्यास ते अद्यापि रोज करीत असतात, हे ऐकून तुम्हांस नवलच वाटेल. परमेश्वराच्या प्रार्थ- नेचा त्यांचा मुख्य कार्यक्रम हाच. हे शिक्षण त्यांना जन्मादारभ्य मिळालेले असते आणि ते त्यांचे एक प्रमुख कर्तव्यच होऊन बसलेले असते. हिंदुस्थान