पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/१२४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

खंड]

अभ्यास.

११९


आले नाहीत. येथे येऊन त्यांनी आम्हांस ज्ञानदान का केलें नाहीं" मी उत्तर दिले,"कारण त्यावेळी देश अथवा राष्ट्र या रूपाने इंग्लंडाला अस्ति- त्वच नव्हते. येथे येऊन त्यांनी काय झाडांस उपदेश द्यावयाचा होता?"
 सुप्रसिद्ध अमेरिकन तत्त्ववेत्ते इंगरसोल मला एकदा म्हणाले, " पन्नास वर्षांपूर्वी तुम्ही येथे आला असतां व धर्मावर व्याख्याने तुम्ही दिली असती तर तुम्हांला लोकांनी झाडाला लटकावून फाशी दिले असते, तुम्हांला दग- डमार केला असता, किंवा त्यांनी तुम्हाला जिवंत जाळून टाकलें असतें."
 ख्रिस्ती शकापूर्वी १४०० वर्षांवर जगांत संस्कृतीच नव्हती हे म्हणणे निःसंशय खोटें आहे. जुन्या काळी संस्कृतीला अस्तित्व नव्हते असे म्हण- ग्यास योग्य कारण कांहींच दाखविता येत नाही. फार काय पण रानटी अवस्था आधी की सुधारणा आधी होती या प्रश्नाचाही पूर्ण निकाल अद्यापि लागलेला नाही. मनुष्याच्या प्रथमावस्थेत तो रानटी स्थितीत असून मग तो हळुहळु सुधारत गेला की प्रथम सुसंस्कृतावस्थेत असतां अवनत दशा पावून रानटी स्थितीला तो पोहोंचला याचे निश्चित उत्तर अद्यापि कोणी दिलेले नाही. रानटी अवस्थेतून मनुष्याची सुधारणा झाली हे सिद्ध करण्या- साठी जी प्रमाणे तुम्ही उभी करतां, त्याच प्रमाणांनी आम्ही त्याच्या उलट सिद्धांत सिद्ध करून दाखवितो. रानटी मनुष्य म्हणजे संस्कृत मनुष्याची अवनत आवृत्ति. केवळ रानटी अवस्थेतून मनुष्यप्राणी सध्याच्या सुधारलेल्या स्थितीला पोहोचला आहे हे म्हणणे चिनी लोकांना तरी कधीच पटावयाचे नाहीं; कारण, याच्याविरुद्ध स्थिति त्यांच्या प्रत्यक्ष अनुभवांतली आहे. जेव्हां केवळ अमेरिकन संस्कृतीसंबंधी तुम्ही बोलत असतां जेव्हां तेथील मूळच्या रहिवाशांस तुम्ही विसरता. तुमच्या मनांत केवळ स्वतःच्या गौरकाय कुलाचा विचार मात्र असतो. स्वतःचे कुल येथे चिरस्थायी कसे होईल आणि वाढीस कसे लागेल इतकेंच तुम्हांस पाहावयाचे असते.
 हिंदुलोकांची अवनति गेली सातशे वर्षे सुरू आहे; तेच लोक प्राचीन- काळी अत्यंत संस्कृतावस्थेत होते असे मानण्यास तुमची बुद्धि इतकी का कचरते ? ही गोष्ट अगदी साहजीकपणे पटावी इतकी ती सोपी आहे; आणि याचे मुख्य कारण हेच की याच्या उलट स्थिति होती असें निश्चयाने सिद्ध करणे कोणास शक्य नाही. रात्रींच्या रात्रीत संस्कृतावस्था जमिनीतून उग-