पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/१२२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

खंड] अभ्यास. ११७

खातपीत असतो. रोगाचे स्वप्नसुद्धा त्याला पडत नाहीं; आणि एखाद्या रोगाने त्रास दिला नाही असा एक क्षणसुद्धा माझ्या आयुष्यांत जात नाही. आतां माझ्या डोक्यांत मेंदू कदाचित् अधिक असेल; पण रोगाच्या यातना सुरू झाल्या की ' जळो तो मेंदु, तो त्या रानटी मनुष्याला देऊन त्याचे शरीर मी मोठ्या आनंदाने घेईन ' असे विचार मनात येऊ लागतात. लाटा आणि खाडे यांनीच विश्व निर्माण झाले आहे. एखाद्या ठिकाणी मोठी लाट दिसत असली तर तितक्याच प्रमाणाचा खाडा कोठे तरी असला पाहिजे हे निश्चित होय. कोठे तरी खाडा पडल्यावांचून लाट उठणे शक्य नाही. अशा रीतीने या विश्वांत समतोलपणा सर्वत्र आहे. महत्वाची अशी एखादी वस्तु तुमच्यापाशी असेल, तर तुमच्या शेजाऱ्याजवळ दुसरी एखादी वस्तु तितक्याच महत्वाची असते. याकरितां स्त्रीपुरुषांचे परीक्षण कर्तव्य असतां दोघांच्या मोठेपणाची मापे वेगवेगळी घेतली पाहिजेत हे उघड आहे. दोघांचेही परीक्षण त्यांच्या त्यांच्या कार्यकक्षेत केले पाहिजे. कोणालाही आपला प्रांत सोडून दुसऱ्याचे कार्य करता यावयाचे नाही. ' जेनुं काम तेने थाय ' ही म्हण येथे लक्ष्यात ठेवली पाहिजे. आपल्या मार्गाने दुसरा चालत नाही, म्हणून तो वाईट असें म्हणण्याचा अधिकार कोणासही नाही. जुन्या लोकांच्या चालीरीतीत यत्किंचित् बदल कोणी केला की ' जग बुडालें रे बुडाले ' असे ते म्हणूं लागतात. अशा लोकांना आपण वेडे म्हणत असतो; पण आपल्या स्वतःच्या मताप्रमाणे दुसऱ्या कोणासही दुष्ट समजणारा प्रत्येक मनुष्य याच प्रकारचा वेडा होय. जग बुडालें ही ओरड आज कित्येक शतके आपण ऐकत आहों; पण अद्यापि जग पूर्वीसारखेच चालू आहे. निग्रो गुलामांना मुक्त करावे अशी चळवळ तुमच्या या अमेरिकेंत प्रथम सुरू झाली तेव्हां अमेरिका आतां खास बुडणार असा कोलाहल पुष्कळांनी केला होता; पण अमेरिकेची भरभराट पूर्वीसारखीच आहे हे तुम्ही आम्ही पाहत आहोंच. शूद्र वर्गाला शिक्षण दिलें की जग खास बुडेल असे भाकित पुष्कळांनी केलें होतें ! पण हे भविष्य कितपत खरे झाले ? खालचा वर्ग सुशिक्षित झाला तर जग बुडत नाहींच, पण उलट त्याचे थोडेबहुत हितच होते असा अनुभव मात्र येतो. थोड्या वर्षांमागें इंग्लंडात एक ग्रंथकार होऊन गेला. इंग्रज मजुरांच्या रोजमुऱ्याचे दर वाढत असून त्यामुळे व्यापार कमी होत आहे आणि इंग्लंड देश लव-