पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/68

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

४०

स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

हजारों स्त्रीपुरुषांची गर्दी उडून राहिली होती. हिंदुस्थानांतील कृष्ण व बुद्ध यांची पूजा करणाऱ्या स्वामींचें शिकागो येथे भरलेल्या सर्व-धर्माच्या परिषदेंत वेदांतावर व्याख्यान झाले होते व त्यावेळी एकंदर व्याख्यानांमध्ये यांचे व्याख्यान सर्वांस फार आवडले होते. केवळ धर्मासाठी यांनी आपल्या सर्व उच्चतम आशा बाजूस ठेविल्या आणि कित्येक वर्षे निरलसपणे त्यांनी पुरातन तत्वज्ञानाचा अभ्यास केला. पाश्चात्य शास्त्रांचाहि त्यांनी चांगला अभ्यास केला आहे. पाश्चात्य शास्त्रे आणि जुनी वेदांततत्वे यांचे अपूर्वसंमेलन त्यांच्या ठिकाणी झालें आहे. त्यांची संस्कृति, विद्वत्ता, वक्तृत्व, शुद्धाचरण आणि पावित्र्य यांची कीर्ति अगोदरच पसरली असल्यामुळे आपणास आज कांहीं तरी अलभ्य लाभ होणार आहे असे वाटून सर्व श्रोते भाषणश्रवणासाठी अगदी उत्कंठित होऊन राहिले होते. त्यांची उत्कंठा विफल झाली नाही.

स्वामींची कीर्ति आपण ऐकिली ती प्रत्यक्षापुढे कांहींच नाही असेंच सर्वांचें मत झाले. काषायवस्त्र परिधान केलेले हे स्वामी श्रोत्यांपुढे उभे राहिले तेव्हां त्यांच्या अंतर्गत तत्वविचारांचे अपूर्व तेज त्यांच्या मुखमंडळावर झळकत होतें. प्रेम, सहानुभूति आणि सहिष्णुता ही मूर्तिमंत त्यांच्या मुखावर व्यक्त होत होती. इंग्रजी भाषेवरील त्यांचे प्रभुत्वहि वाखाणण्यासारखे आहे. बुद्धाचें तत्वज्ञान आणि ख्रिस्ताची नीतितत्वे यांचा अपूर्व संयोग ज्यांत झाला आहे असा नवा धर्म शिकविण्याकरितां स्वामी महाराज येथे आले आहेत. हिमालयांतील साधु कसे असतात याची कल्पना स्वामींच्या दर्शनाने आम्हांस झाली.

स्वामींच्या व्याख्यानासंबंधी कोणी कांही म्हटले तरी एकंदरीने त्यांचे व्याख्यान अत्यंत चित्ताकर्षक होतें यांत तिलमात्र संशय नाही. डाक्टर लुई जेम्स यांनी स्वामींची श्रोत्यांस ओळख करून दिल्यानंतर स्वामी श्रोत्यांचे मनःपूर्वक आभार मानून ह्मणाले :

"जगांत उपलब्ध असलेल्या सर्व धर्माचा अभ्यास करणे हाच माझा धर्म होय. ख्रिस्ती धर्मपुस्तकांचा मी चांगला अभ्यास केला तेव्हां मला माझ्या मातृधर्माचें चांगले ज्ञान झाले. मला जी काही तत्वें पूर्वी गूढ वाटत होती त्यांची नीट संगति लागली. सत्य हे सर्वत्र एकच आहे. ज्याप्रमाणे एखादा सहा बोटांचा मनुष्य हा सामान्य मानवी देहाचा नमुना नसून त्यास सृष्टिबाह्य असे आपण ह्मणतों तशीच धर्माचीहि गोष्ट आहे. कोणताहि एक धर्म खरा म्हटला की, बाकीचे सर्व खरे असलेच पाहिजेत. जगांतील सर्वच धर्म खरे असल्यामुळे