पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/67

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रथम खंड.

३९


स्वामीः- भगवान् येशुख्रिस्त परमेश्वराचा प्रत्यक्ष अवतारच होता. त्यास मारणे शक्य नव्हते. आपण ख्रिस्ताला क्रुसावर खिळून मारले असा यहुदीलोकांस दृष्टिभ्रम झाला.

श्रोता:- असे दोन तीन येशुख्रिस्त प्रभूनें निर्माण करून दाखविले असते तर तो मोठाच चमत्कार झाला असता. नाही ? .

स्वामीः- सत्याच्या मार्गात चमत्कार मोठाच अडथळा आणितात. भगवान् बुद्धाला त्याच्या शिष्यांनी एकदां एक मनुष्य चमत्कार करतो ह्मणून सांगितले. शिष्य ह्मणाले, 'लोट्याला हात लावल्याशिवाय अमक्या मनुष्याने तो बराच उंच उचलिला.' त्यावर भगवानांनी सांगितले की चमत्कारांच्या मागे न लागतां सत्यशोधनाच्या मागे लागा. आपली बुद्धि तीव्र करून तिच्या प्रकाशाने चालण्याची संवय करा. चमत्कारांच्या मागे गेल्यास केव्हां खड्डयांत पडाल याचा भरंवसा नाही.

श्रोता:- येशुनिस्ताने पर्वतावर आपल्या शिष्यांस उपदेश केला यावर आपला विश्वास आहे काय ?

स्वामीः- होय. पुस्तकांत असे लिहिले आहे त्या अर्थी इतरांप्रमाणेच मलाहि त्यावर विश्वास ठेवणे भाग आहे. परंतु खऱ्याखोट्याचा हा प्रश्न बाजूस ठेविला तरी त्यांतील विचार आपणा सर्वोस सारखेच ग्राह्य होण्याजोगे आहेत. भगवान् बुद्धाने निस्तापूर्वी पांचशे वर्षे धर्मज्ञान सांगितले. त्यांतील सारांश आपण पाहावा. खऱ्याखोटयाचा निवाडा करण्यांत फायदा नाही. ख्रिस्त काय, जरदुष्ट काय अथवा कन्फ्यूशस काय ? या सर्वांची वचनें नेहमी कल्याणप्रदच असतात.

हिंदु धर्म.

[ब्रुक्लिन स्टँडर्ड पत्रावरून.]

 ता. ३० डिसेंबर १८९४ रोजी परमहंस स्वामी विवेकानंद यांनी ब्रुक्लिन एथिकल सोसायटीच्या विनंतीस मान देऊन वरील विषयावर एक व्याख्यान दिले. व्याख्यानास हजारों स्त्रीपुरुषांची गर्दी झाली होती. स्वामीजींचे व्याख्यान चालू असतां सर्व श्रोतृगण चित्राप्रमाणे तटस्थ झाला होता. हिंदुस्थानांतील पुरातन ऋषिमंडळ जणूं काय स्वामीजींच्या मुखाने बोलत होते असे वाटले.
 अत्यंत पुरातन धर्मतत्वांचे प्रतिनिधि या नात्याने स्वामींची कीर्ति अगोदरच सर्वतोमुखी झाली असल्यामुळे व्याख्यानश्रवणास सर्व प्रकारच्या धंद्यांच्या