पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/63

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रथम खंड.

३३

 मी निराळा आणि परमेश्वर निराळा असें द्वैत जेव्हां आरंभी मानवी हृदयांत असते तेव्हां मी ह्मणजे अमुक एक गोमाजी आहे व अनंतकालपर्यंत मी गोमाजीच राहणार असें त्यास वाटत असते. देहावरील त्याची ममता इतकी पक्की असते की, आंतील आत्म्याच्या स्वरूपाकडे त्याचे लक्ष्यच जात नाही व यामुळे 'मी' ह्मणणाराचे खरे स्वरूप देहाहून कांहीं निराळंच असेल की काय, अशी नुसती शंकाहि त्यास येत नाही. यामुळे देहाध्यासाने एखाद्या खुनी मनुष्याचीहि अनंतकालपर्यंत खुनीच राहीन असें ह्मणण्यापर्यंत मजल जाण्याचा संभव आहे. परंतु या देहाध्यासाचे परिणाम दुःखप्रद आहेत असें हळू हळू त्याच्या लक्ष्यांत येऊन त्यापासन पराङ्मुख होऊन तो कालेकरून आपल्या आरंभींच्या अ‍ॅडमच्या पवित्र स्थितीस परत जातो.

 ज्यांचें अंत:करण शुद्ध आहे ते परमेश्वरास पाहतील.' परमेश्वरास आपण पाहूं ही गोष्ट शक्य आहे काय ? नाही. खास नाही. तसेंच परमेश्वरास आपणास जाणतां येईल ह्मणावें तर तेंहि शक्य दिसत नाही. जर अमुक हा परमेश्वर असें दाखवितां आले तर त्याच क्षणी त्याचे परमेश्वरत्व ह्मणजे सर्वव्यापित्व नष्ट होते याची वाट काय ? परंतु 'मी आणि माझा पिता एकच आहों' असे में बायबलांत म्हटले आहे ते मात्र खरें; कारण परमेश्वरस्वरूप पाहतां आलें नाही अथवा जाणतां आलें नाहीं तरी त्याचा अनुभव अंतर्यामी होणे हे युक्तीस सोडून नाही. पाहणे अथवा जाणणे असें ह्मटले ह्मणजे तें दृश्य अथवा ज्ञेय विशिष्ट मर्यादेने व्याप्त आहे असे होते; आणि परमेश्वरस्वरूप मर्यादित असणे शक्य नाही. कित्येक धर्मात ही कल्पना स्पष्ट शब्दांनी सांगितली आहे व दुसऱ्या कित्येकांत केवळ प्रसंगानें सूचित केली आहे; व आणखी कित्येकांत तर तिचा मागमूसहि लागत नाही. आपल्या या देशांत ( अमेरिकेंत) ख्रिस्ताने सांगितलेला संदेश क्वचितच कोणा एखाद्यास समजला असेल. आपणास राग येऊ देऊ नका; परंतु आजपर्यंत ख्रिस्ताचा संदेश ख्रिस्ती ह्मणविणाऱ्यांपैकी कोणास केव्हांच नीटसा समजला नाही.

 आतां या शेवटच्या पायरीपर्यंत पोहोचण्यापूर्वी तळापासून आरंभ करून क्रमाक्रमाने एक एक पायरी आक्रमिली पाहिजे, हे खरें. धर्मपुस्तकांनी जे निरनिराळे अनेक मार्ग दाखविले आहेत त्या सर्वांचा आदिपाया हेच तत्व आहे. निरनिराळ्या अधिकाराच्या मनुष्यांस निरनिराळे मार्ग सांगणे इष्ट आहे. इतकेच नव्हे तर ते अत्यंत जरुरीचेंहि आहे. यामुळे पुष्कळ वेळां बाह्यतः वि-स्वा. वि. ३